जाणार होतो मी तसाही...

Submitted by स्वाकु on 27 February, 2014 - 04:34

थडगे तसे सजलेच नाही
मी ही कुणा जपलेच नाही

मी एकटा माझाच रडलो
अश्रू जरी ढळलेच नाही

मरणे मला हसणार होते
जगणे मला जमलेच नाही

जाणार होतो मी तसाही
का थांबलो कळलेच नाही

करणार होतो मी खुलासे
पण बोलणे सुचलेच नाही
                 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचे तीन जास्त आवडले
त्यातही चौथा फार छान वाटला

धन्यवाद