हा 'गुन्हा' होईल ही कोणास पर्वा

Submitted by जयदीप. on 26 February, 2014 - 09:21

आठवांचे एक मोठे वलय आहे
मी तिथे रेंगाळण्याचेच भय आहे

मोकळा होऊनही उडणार नाही
या खगाला पिंजर्‍याची सवय आहे

हा 'गुन्हा' होईल ही कोणास पर्वा
प्रेम करण्याचे खरे हेच वय आहे!

नाइलाजास्तव कुणी करतात चोरी
अन् नशीबाचे कुणाला अभय आहे

नेहमी शोभून ती दिसणार जोडी
नेहमी विद्येसवे जर विनय आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users