वेगळाली

Submitted by अमेय२८०८०७ on 21 February, 2014 - 22:44

दिसते त्याहून खोल काही चालते भोवताली
स्तरा-स्तरांतील जीवनाची गूढता वेगळाली

बरा भावनेला पुरता पारखा होतो कलंदर
संग घडला तुझा नाहक पापणीला ओल आली

फोल क्षणाचे हसणे माझे दुभंगून मालवते
वाहुनही अमर म्हणवती तुझे अश्रू भाग्यशाली

काही बेभान खगांना केवळ उडायचे नसते
पंखांवरुन उजळत न्यायच्या असतात युग-मशाली

तशी सावरुन आता ती जगण्याला रुळते आहे
कधीमधी आक्रोशुन रडते पाहत कमरेखाली 

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१, ३, ४ आणि ५ - ह्या शेरांचा आशय फार आवडला. पाचवा फारच भेदक शेर! लय मात्र समजली नाही.

(कमर व कंबर - कमर हिंदी व कंबर मराठी)

काही बेभान खगांना केवळ उडायचे नसते
पंखांवरुन उजळत न्यायच्या असतात युग-मशाली >>>> क्या बात है....

अमेयराव, अतिशय सुंदर रचना ......

काही बेभान खगांना केवळ उडायचे नसते
पंखांवरुन उजळत न्यायच्या असतात युग-मशाली

व्वा. अनेक विचार आवडले.
लय पहालच.