स्विकार...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 21 February, 2014 - 19:15

तुझे मुलायम मउ दोन्ही हात
आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी..
कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर
शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण!
माहित असतं नंतर ..
पुन्हा तोच एकाकीपणा मला
छळायला येणार आहे...
आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर!
कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?
मग येते काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं... आणि पुन्हा जीवनाच्या अखंड न थांबणाय्रा प्रवासाचा अपरिहार्य स्विकार... हेच निसर्गानी माणसाला शिकवलेलं रोखठोक उत्तर असावं... यावरचं!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users