दिल तो बच्चा है जी ..

Submitted by सत्यजित on 15 February, 2014 - 05:38

निळ्या नितळ आभाळी
शुभ्र ढगांचे पुंजके
हिरव्या कंद तृणांवर
स्लो मोशन मध्ये पडणाते तुषार
म्हणजे तू आलीस...
कसं काय जमतं तुला
असं निसर्ग पांघरून येण?
इवली पिवळी टिकली
जणू इवल ना़जूक रानफुल
पाठीवरली सैलसर वेणी
झुळके सरशी रानभुल
पहात रहावं तुला...
की बकूळ सडा पडतो
पहात रहावं तुला...
की अलवार प्राजक्त बहरतो

पहात रहीलं तुला...
की मी विचार करत नाही
विचार येत रहातात

तू माळलास गजरा
की वसंतोत्सव साजरा
तू माळतेस म्हणुन
सुंदर दिसतो गजरा
नाहीतर विकणार्‍यांच्या
हातावर नसत्या का
खिळल्या नजरा?
तूला जरा उशीर झाला की वेध लगतात
तुझे विचार वेड लावतात
तू आलीस की ऋतू कूस बदलतो
आणि वेधशाळेचे अंदाज चुकतात
तुझी ओढणी उडाली की
हवेत गारवा येतो
तुझ्या कडून येणारी झुळुक
मृदगंध घेउन येते
तू हसलीस की
की कुठुनश्या अलवार तरंगत
गुलाबाच्या पा़कळ्या येतात
आणि मनाचा फुल्ल गुलकंद होतो

तू म्हणशील, "चल.. काय वाट्टेल ते"
पण लिहीलय.. जे वाटले ते
कवी सारखं नाही जमत
मला यमकात व्यक्त होणं
असं सौंदर्य पाहीलं की
सुचते म्हणे कविता त्यांना
पण सुचतेच कशी अशी कविता?
पाहीलच नसेल कधी त्यांनी
खरचं पाहीलच नसेल कधी त्यांनी....
असं निशब्द करणारं सौंदर्य...

-सत्यजित.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण सुचतेच कशी अशी कविता?
पाहीलच नसेल कधी त्यांनी
खरचं पाहीलच नसेल कधी त्यांनी....
असं निशब्द करणारं सौंदर्य...

सुंदर