आज प्रेम दिवसाला ती आठवली

Submitted by सांज मन on 14 February, 2014 - 01:26

आज प्रेम दिवसाला ती आठवली
अन त्याने विस्की मागवली

बर्फ टाकला आठवणींचा
अन पहिल्या भेटीची साक्ष रिचवली

ग्लास फिरवला गोल जरा
अन तिची हसरी मुद्रा तरंगली

कुत्सित हसला स्वताशीच
अन एका घुटात उरलेली संपवली

अजून दे म्हणाला ३० ml
अन ती परत अवतरली

अश्रू पडला एक ग्लासात
त्यान विस्की ६० ml वाढवली

प्रेमाची भरली ती बॉटल
तिने "जा तू" म्हणत दोनच शब्दात संपवली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users