मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

आणि समजा जिप्सिनी जुन्या काहि थीम्स मध्ये १० फोटो टाकलेत आणि आता नव्या धोरणानुसार त्यातले ३-४ काढावे लागणार असतील तर ती थीम त्याच्यासाठी अपुर्ण रहाते. अशावेळी सर्व फोटो काढले तर चुकले काय? >>>> हा मुद्दा वेगळाच आहे. पण हा प्रश्न असेल तर योग्य उत्तर हेच होईल की होय, मग सर्वच फोटो काढावेत!! त्यात काही चर्चा करण्यासरखे दिसत नाही!

पब्लिक इव्हेंट्स कव्हर करणार्‍यांसाठी (फोटोग्राफर्स) मुद्दा काय, की तुमचे फोटो पब्लिश करण्याची जबाबदारी पब्लिश करणार्‍यांवर ढकलून मोकळे व्हा. (प्लीज, पूर्ण वाचा मी काय म्हणतोय)

हजार टीव्ही अन पंध्रा हजार चिरगूट पेप्रांचे फ्रीलान्सर्स फोटू काढत फिरतात मिरवणूकांत. मलाही कुणि माझ्यावर क्यामेरा रोखला की हात हलवून हाय म्हणायला आवडतं. माझं तोंड सुंदर दिसतं, माझं बछडं गोड दिसतं (असं मला वाटतं) म्हणूनच नटवून थटवून मी पब्लिकमधे मिरवायला नेत असतो.

कुणी फोटू काढला तर दुसर्‍या दिवशी पेप्रात छापून येईल, वा च्यानलवर दिसेल, अन आलाच तर मी सगळ्यांना दाखवीन हीच सगळ्यांची इच्छा असते.

मग, माबोवर च अशी पालिशी काब्रं भो?

तर, माबोसारखे संस्थळ चालविताना, किचकट अन खडुस लोकांच्या कायदेशीर बोचकार्‍यांना तोंड द्यावे लागते. अन ते कितपत, त्याची थोडी कल्पना आहे. सबब, त्यांनी जी पॉलिसी ठरवली, ती बरोबर आहे.

फोटो टाकताना आधी स्वतःला विचारा, की उदा. ये सिझ्लर मैन कुक किया, इस्का फोटो टाकू क्या? अगर मैने 'हाव' बोल्या, तो टाको.

शंका आली, तर आधी नियमावली वाचा, ती वाचूनही शंका फिटली नाही, अन फोटो टाकायलाच हवा, अशी दुर्दम्य ऊर्मी दाटून आली, तर तो फोटू कुण्या अधिकारी व्यक्तीस मेल करा, परवानगी घ्या, अन बेश्ट म्हंजे, हितल्या पब्लिशरलाच पब्लिश करायला सांगा.

हाकानाका!

इत्का बेसिक अर्थ आहे या अनाउन्समेंटचा. प्रशासन सी.वाय.ए. (तुमचे गाढव झाका) अशी पॉलिसी वापरीत आहे, आपल्या गाढवामुळे त्यांच्या गाढवाला प्राब्लेम येऊ नये, इतकी शिंपल अपेक्षा हाये त्यांची. Wink

ते मोबाईलमध्ये किती पिक्सेल कॅमेरा असतो याचा उल्लेख कशासाठीये कळलं नाही मला.
जर असं म्हणायचं असेल की बाहेर रस्त्यावर कोणीही नकळत तुमचे फोटो काढू शकतं तर ..
बाहेर दुसरं कुणी (गैरवापर कारणारी व्यक्ती) एखाद्या मुलाचे नकळत फोटो काढून गैर्वापर करु शकतेच म्हणून इथे फोटो टाकताना परवानगी घेतली नाही तरी चालेल किंवा परवानगीचा अट्टहास कशासाठी असं कुणी कसं काय म्हणू शकतं हे मला कळत नाहीये.

परवानगी घेणं योग्य आहे, परवानगी घ्यावी हे जर पटत असेल तर बाकी जगात कोण काय करतंय्/किंवा काय होवू शकतं यावर चर्चा करायची काय गरज.
तुम्हाला फोटो काढायचेत, ओके परवानगी घ्या आणि काढा प्रसिद्ध करा.

माबोवरच्या फोटोग्राफर्सची अवस्था "अनारकली" सारखी होणार आहे....

अकबर (फोटो काढा गटातले) उसे जीने नहि देगा और सलीम (फोटो ठेवा गटातले) उसे मरने नहि देगा... Happy

अल्पना,
माझी पोस्ट वाचली, तर या लोकांना 'इथे'च अट्टाहास कशासाठी ते समजेल Happy

त्यांचा अट्टाहास, 'प्रसिद्ध झालेली मते संपादक्/मालकांची नाहीत' असे डिस्क्लेमर टाकून जबाबदारी झटकायची, यासाठी नसून, आपल्या सगळ्याच मेंब्रांना सेफली उत्तमोत्तम कंटेंट, इंटरनॅशनली देता यावं यासाठी आहे, असं मला वाटतं.

^या वाक्यास 'लांगुलचालन' असा शब्द वापरता येईल, पण हे माझे ऑनेस्ट ओपिनियन आहे.

(आधी तुमची पोस्ट वाचून वेगळे मत झाले होते, एडिटनंतर माझी शब्दरचना पुन्हा बदलली, माफी!)

आशुचँप,
बरोबर आहे तुमचा मुद्दा. म्हणूनच म्हंटले तुम्हाला तुमची जबाबदारी मोठी वाटली तुम्ही तशी पावलं ऊचलली, त्यात आजिबात काही चुकीचं नाहीये. तुम्ही नेमके कुठले फोटो काढून टाकले हे मला माहित नाही पण काल ज्यात काहीच वावगं नव्हतं आणि आज ते सगळं एकदम सगळं टिकिंग टाईमबॉंब सारखं वाटतंय.
तुम्ही फोटो काढून टाकतांना तुमचं बेस्ट जजमेंट वापरलं असेल ह्यात शंका नाही, आणि मी वर म्हंटल्याप्रमाणे ह्यात आनंदच वाटला, पण प्रशासनाच्या धोरणांनंतर एकदम असं पॅनिक पसरल्या सारखं व्हावं ते काही रुचलं नाही.

इब्लिस माझ्या पोस्टचा काहीतरी विचित्र अर्थ होत होता. Happy आता बदलली मी पोस्ट.

(मी ते या धोरणाची काय गरज किंवा परवानगी का घ्यायची म्हणणार्‍यांसाठी टाकलं होतं)

असो.. आता परत परत तेच तेच लिहिताना फारच घोळ होत आहे. Happy

आशुचँप, तुम्ही आता चमन जेव्हा सांगतील तेव्हा फोटो काढा मायबोलीवरचे त्यांना रुचेल तेव्हा मग बर वाटेल.

चमच्या विनोदी पोस्टस आहेत.
एका वाक्यात, आशुचॅम्प्चे जजमेंट बरोबर आहे. दुसर्‍या वाक्यात आनंद व्यक्त आणि पुन्हा , लगोलग फोटो काढलेले रुचले नाही...
कायच्याकाय्च पोस्टी.

>>>>>>> कारण आपण सज्ञान आहोत आणि आपल्याला आपली प्रायवसी प्रिय आहे. अनोळखी (भलेही त्यांच्याशी वर्षोनुवर्षे गप्पा मारत असू किंवा हिरहिरिने वाद घालत असू) माणसांना आपले नाव कळू नये चेहरा दिसू नये म्हणून आपण खबरदारी घेतो. का? तर जगात सगळेच लोक चांगला आणि नेक हेतू घेऊन वावरत नाहीत ह्यावर आपला विश्वास आहे. मग जसे आपल्यापुरते हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार आहे तसे दुसर्‍याची अशी माहिती ऊघड न करणेदेखील आपले कर्तव्य आहे. <<<<<<<<<<<

कस्ल मनातल बोललास रे पराग, ब्रेव्हो.....
अरे पण वरील तू म्हणत असलेली प्रायवसी की कायते, "आपले नाव/चेहरा कळू नये" मी पाळू पहात होतो तर माझ्या (अन जोडीने अ‍ॅडमिनच्याही) खनपटीला बसुन एक कम्पू जाहीरपणे "हा ड्युप्लिकेट्/विकृत" म्हणून शन्ख करत होता तेव्हा हे नियम /सन्केत्/निती कुठे गेले होते?
अरे बाबा लोक एकीकडे आयडीमागे चेहरा लपवू पहातात, तर ते देखिल बर्‍याच जणान्ना सहन होत नाही, अन बहुतेकदा तेच बरेच जण जेव्हा वरील फोटोच्या विषयावर मात्र "प्रायवसी" वगैरे "अमेरिकन कायद्याधारित" भुमिका घेऊ पहातात तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो.
दुसर्‍याची प्रायवसी जरुर जपली पाहिजे, किम्बहुना "दुसर्‍याच्या कोणत्याच बाबीत नाक खुपसू नये" ही शिकवण आम्हाला कायद्याने नव्हे तर बालकडूमधुन मिळाली आहे. प्रश्न आहे तो "प्रायवसी" चे स्तोम किती माजवायचे/ मर्यादा अक्शी निश्चित करायची/
काही देशात म्हणे, (ऐकिव माहिती) दुसर्‍याच्या लहान बाळाला "खाणाखुणा/बोबडे बोल" व अशाच कशाही प्रकारे खुणावले/लक्ष वेधले /कौतुक केले तरी तो म्हणे गुन्हा होतो, बाळाची प्रायवसी/अन त्यावर तुमच्यामुळे झालेले संस्कार वगैरे बाबी असाव्यात त्यात. खरे खोटे परदेशात रहाणारे जाणोत.

भारीच कीस पाडता बोवा तुम्ही लोकं.
मला वरील धोरणाचा जो अर्थ लागला/समजला तो असा की:
१) मी काही एक फोटो काढले
२) ते काढताना मी त्या त्या सजीवाचि वा निर्जिवाच्या मालकाची परवानगी घेणे ही माझी जबाबदारी आहे.
३) ते फोटो मी पब्लिश केले (इथे माबोवर वा खरेतर कुठेही) तरी त्यासही त्या त्या सजीव/निर्जिवाच्या मालकाची परवानगी घेतलेली असायला हवी.
४) मी तसे न करुनही इथे फोटो पब्लिश केले, तर त्याची कायदेशीर जबाबदारी पूर्णपणे माझेवर राहील, माबोवर नाही. व काही कायदेशीर प्रश्न उपस्थित झालेच, तर माबोप्रशासनाला त्या त्या प्रशासनिक संस्थान्ना पूर्णपणे सहयोग करणे बाध्य राहील.

यात विशेष ते काय? अहो लोकान्च्या फोटोचे जाऊदे, मी इथे जे काही लिहीतो त्याची जबाबदारी देखिल पुर्णपणे माझ्यावरच आहे, मी माबो प्रशासनाकडुन त्याबाबत काय अपेक्षा करू शकणार? अन का करावी? अन या भितीमुळे मी इथले लिहीणे थाम्बवतो का? तसेच फोटोचे देखिल आहे.
माबो प्रशासनाने एक सावधगिरीची सूचना म्हणुन हे मांडले आहे. अन कदाचित त्यास माबो जिथे रजिस्टर आहे त्या देशाचे/युरोप-अमेरिकेचे कायदे लागू असल्याने हे डिस्क्लेमर देणेही कदाचित बंधनकारक असावे.

पण त्याने काय बिघडणार आहे?
उद्या मी जर बेशिस्त वाहनचालक/पादचार्‍यान्चे चेहर्‍यानिशी फोटो टाकले अन त्या पादचारी/गाडीमालकाने माझेवर खटला भरला तर त्यास मलाच तोन्ड द्यावे लागेल, पण मी जर बेशिस्तीच्या "गुन्हेगारी" वागण्याचे फोटो काढून प्रसिद्ध करणे या मुद्याशी ठाम असेन तर मला खटल्याची भिती बाळगुन मुद्दा सोडून देण्याचे कारण उरत नाही, असे माझे मत.

अहो (काही मोजकीच) लोकं तिथे टोलवरुन टोलमधल्या भ्रष्टाचारावरुन आख्ख्या राज्यसरकारला "उघडे" पाडताहेत, त्यान्ना भिती नाहिये का खटल्यान्ची? पण ते त्यान्च्या भुमिकेशी/मुद्याशी ठाम आहेत, अन आपण इथे एखादा फोटू मुळे एखाद्या नरपुन्गवाची प्रायवसी भ्रष्ट/नष्ट होईल का या भितीने आधीच गर्भगळीत झालो आहोत. असो.

आता यावरही काहीजण मुद्दा मान्डू पहाताहेत की तुम्ही पब्लिश केले ल्या फोटोचा "दूसर्‍याच नग्न वगैरे धडावर चेहरा डकवुन वगैरे" दुरुपयोग केला जाईल, तर तो ज्याचा फोटो आहे त्याच्या प्रायवसीचा भन्ग होईल.... मुद्दा उचित आहे,
पण इथेही "चोर सोडून सन्याशाला बळी देण्याची " समुहान्ची त्रिकाला बाधित वृत्तीच जाणवते, कारण जर असे झाले तर दुसर्‍याच नग्न वा तत्सम धडावर भलत्याचाच चेहरा डकवणे व पब्लिश करणार्या विकृत व्यक्तिला पकडण्या ऐवजी सोईस्कररित्या व सोपे आहे म्हणुनही मूळ फोटो काढणार्‍यालाच पकडायची वृत्ती दिसून येते. (दुर्दैवाने माबोपुरता "विकृत" हा शब्द इतक्या काही मूर्ख लोकान्नी आचरटपणे नको तिथे नाही त्या व्यक्तिंबाबत वापरुन वापरुन गुळगुळीत केला आहे की लोकान्ना या शब्दाचा नेमका अर्थ तरी उमगतो की नाही याची शन्का आहे)
आता यादेशीचे वा देशोदेशीचे कायदे याबाबत सन्याशाला पकडतात की विकृत चोराला हे देशकालवर्तमान परिस्थितीप्रमाणे घडते, अन बहुधा तिथे "कायदा" चटणीकोशिम्बिरीप्रमाणे सोईस्कररित्या तोन्डीलावण्यापुरताच वापरला जातो असे माझे मत. (आमच्या इकडे तर काय? शन्कराचार्यान्पासून रामदेवबाबापर्यन्त कुणालाही कशाही क्लॉजखाली अडकवले/धरले जाऊ शकते, कशा कशाची भिती बाळगायची? असो)

मी काढत असलेल्या फोटोमधे मी शक्यतो एकही मर्त्य मानव येऊ देत नाही. जर फोटु पब्लिश करायचेच झाले तर बहुतेकवेळा केवळ माझेच प्रदर्शित करतो. इतरान्चे करायची वेळ आली तर डोळ्यावर काळ्यापट्ट्या चिकटवुन करतो, जसे ते २००६च्या वविचेवेळेस केले होते. मात्र रस्त्यावरील फोटोग्राफीमधे हे शक्य होणार नाही जसे ते स्पर्धेमधले फोटोत झाले आहे, अन त्याची जबाबदारी पूर्णपणे माझेवर आहे हे मला मान्य आहे. (अरे थोडातरी खमकेपणा दाखवा की! समजा त्या एका फोटोतील मडकेविक्या उद्या माझ्यावर खटला भरू पाहू लागला, तर भरुदेकी त्याला...... तेव्हाच तेव्हा बघुन घेऊ, अन तितका विश्वास न्यायसंस्थेवर आहे माझा...)

बायदिवे, इथला विषय नसेल कदाचित पण ओघात येतोय म्हणून सान्गू पहातो, गेल्या पन्चवीस वर्षात मी काढलेल्या अनेक फोटोतील अनेक व्यक्ति गचकल्या, अन त्या गचकल्यानन्तर, तसबिरी करुन लावायला त्यान्चे फोटो त्यान्च्या कुटुंबियांकडे नसल्याने शेवटी माझ्याकडून अशा सुन्दर पोट्रेट टाईप फोटोच्या प्रति अनेकजणान्नी "विनाधन्यवाद" नेल्या आहेत हा माझा एक अनुभव. तर, मनात एक कल्पना अशीही पूर्वीपासून तरळते आहे कि "तुम्ही गचकल्यावर तुमचा तसबिरीयोग्य फोटो माझे संग्रही असुद्यावा म्हणून काढतो आहे" असे ज्यालात्याला सान्गावे का? Wink

जाऊ द्या हो लिंबूशेठ!
सोडून सोडा की राव....विषय म्हणतो की!
इथे प्रत्येकाचे विचार ठाम आहेत. अगदी तुमच्या-माझ्यासह. ते चुकीचे/बरोबर आहेत की नाही हे सापेक्ष आहे..तेव्हा कशाला कुणाला सल्ला द्या... बघा, नाही म्हटलं तरी इथे मी देखील तेच करतोय. Happy
पण हीच तर गंमत आहे मनुष्यस्वभावाची...कमी-जास्त प्रमाणात हे असंच परस्पर विरोधी आपण सगळे वागत असतो(मान्य करा/करू नका)...आता आलं का लक्षात? Proud

या नियमावलीचे अनुपालन करायचे फोटोग्राफरने ठरविले तर कितीतरी प्रश्न त्यांचेपुढे उभे राहतील आणि बहुतेक जण आपाआपल्या कॅमेर्यास मॅन करणे पसंद करतील. पर्यायाने माबोवर प्रचि दिसने दुर्मिळ होईल.

देवसाहेब, अगदी बरोब्बर लक्षात आलं! म्हणून तर म्हणल आहे ब्रह्मंसत्यंजगन्मित्थ्या ( व्याकरण करेक्ट करुन घेणे).
प्रत्येकजण एकेक मुखवटा घालून असतो या कलियुगातील. किम्बहुना कलीयुग हेच "मुखवट्यान्चे जग" म्हनून ओळखले पाहिजे.
बघा हं पटत नसेल तर सान्गतो, बायकोबरोबर वागताना एक मुखवटा, पोरान्बरोबर वेगळाच ऑफिसात साहेबासमोर / कस्टमर समोर एक मुखवटा तर बॉसच्या सुन्दर सेक्रेटरीबरोबर वागताना भलताच मुखवटा, रस्त्यावरच्या बाकी पादचारी/वाहनचालकान्करता एक मुखवटा, तर समोर भिकारी आला तर वेगळाच मुखवटा, अन कधी आपल्यावरच भिकारपणाची वेळ आली तर राखिव मुखवटा......... असो.
तर मुद्दा असा की "प्रायव्हसी" ही या अशा तर्‍हतर्‍हेच्या मुखवट्यांशी सम्बधित तर नाही? म्हणजे काय की, असाच एखादा मुखवटा फोटोग्राफरने क्याप्चर केला तर????? ही अशी भिती तर नसते ना प्रायवसी की कायते जपण्यामागे? मी विचार करतोय हां, मत नै बनविले आजुन यावर.

सद्द्या महाजालावर एक विनोद फिरतोय...नया है वह! Happy

तसाच आता अजून एक विनोद तयार झालाय....ह्यासाठी आधी परवानगी घेतलेय का? Proud

नीलनं मांडलेला रेझोल्युशनचा मुद्दा परफेक्ट आहे. (परवा वाचताना माझ्या मनातही हे आलं होतं. पण म्हटलं, आपण काही ट्याक्निकल व्यक्ती नव्हे, तेव्हा न बोललेलंच बरं.)

पुन्हा एकदा सांगते - मूळ मुद्दा तत्वतः मान्य आहेच, तरीही इतक्या चर्चेनंतर अजून उपाय सापडलेलाच नाहीये...

उदा:
आमच्या नेपाळी वॉचमनचं बछडं अत्यंत गोंडस आहे. त्याच्या बायकोला समजा मी विचारलं... "इसका फोटो निकालके अपने दोस्तोंको दिखाऊ तो चलेगा?" ती (मोस्टली आनंदानं) 'हो'च म्हणणार. ही झाली परवानगी. (दोस्तोंको कसं दिखाऊ? - हे तिला सांगण्याची माझी तयारी असली, तरी तिला ते समजण्याची शक्यता अगदी नगण्य.)
मग समजा मी फोटो काढून व्हॉटस-अ‍ॅपवर टाकला किंवा फेसबूकवर टाकला... माझी मित्रमंडळी तो पाहणार, 'लाईक' करणार,
सगळं परवानगीनुरूपच चाललेलं असणार...

किंवा समजा, फोटोग्राफीची एखादी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत त्या बाळाचा फोटो कुणी पाठवला (पुन्हा वर लिहिलंय तशी परवानगी घेऊन, आईला स्पर्धेबद्दल सांगून) आणि त्या फोटोला समजा बक्षीस मिळालं, स्पर्धेच्या वेबसाईटवर सर्व बक्षीसपात्र फोटो प्रकाशित होणार...
सगळं परवानगीनुरूपच चाललेलं असणार...
फारफार तर त्या आईला जाऊन आनंदानं सांगता येईल, की तुमच्या बाळाच्या फोटोला बक्षीस मिळालं. त्या लहानग्याला आनंदाप्रीत्यर्थ गोळी-चॉकलेट देता येईल... पण फोटो तर वेबसाईटवर आलेला असणारच.
मग?
यावर उपाय काय?

<हे तिला सांगण्याची माझी तयारी असली, तरी तिला ते समजण्याची शक्यता अगदी नगण्य.)
<सगळं परवानगीनुरूपच चाललेलं असणार...>

informed consent हवी. असे फोटो जालावर टाकल्याने त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना दिलेली असायला हवी.
शेवटी हे सगळे छायाचित्रकाराने स्वतः ठरवायचे आहे. हा मुद्दा मायबोलीपुरताच मर्यादित नाही.

ललिता. अशावेळी स्वतः आणि स्वतःचं बाळ त्या आईच्या जागी कल्पनेनं पहायचं आणि स्वतः अशी परवानगी दिली असती का, स्वतःला, स्वतःच्या बाळाविषयी हे चाललं असतं का, असा विचार करुन अशा फोटोबद्दल काही वैयक्तिक निर्णय घेता येईल का?

हेच तर सरमिसळ आहे...........

परवाणगी आणि गैरप्रकार या दोन गोष्टींची इथले लोक सरमिसळ करत आहेत....

परवाणगी घेउन सुध्दा गैरप्रकार होतोच .....मग त्या परवानगीचा उपयोग काय झाला ? समजा असा फोटो वापरला गेला तर फोटोग्राफर काय बोलणार ? " तुमची परवानगी घेउनच काढलेला होता फोटो.."

आता जर असे होणार आहे तर काय करावे ?????? परवानगी घ्यावीच .. यात काही चुकिचे नाही परंतु गैरप्रकाराचे जे स्तोम माजवले जात आहे ते चुकिचे आहे

ज्यांना गैरप्रकार करायचेच असेल तर ते फोटो कसे ही मिळवतातच..

आता काय लोक बुरखा घालुन फिरायचेत का.....कोणीही फोटो काढुन वापरले तर Biggrin

असे फोटो जालावर टाकल्याने त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना दिलेली असायला हवी.

>>> त्या अशिक्षित / अर्धशिक्षित बाईला समजेल अश्या भाषेत कल्पना द्यायची तर ती कशी? - हेच मला विचारायचं आहे. (कृपया, हे वाक्य चौकशीच्या सुरात वाचावे, आर्ग्युमेण्टच्या नव्हे.)

शैलजा, अगदी मान्यच. पण समज, माझा एखादा सख्खा मित्र (किंवा मैत्रीण) फोटोग्राफर आहे, स्पर्धेला माझ्या बाळाचा फोटो पाठवू इच्छितो (इच्छिते)... तर मी तरी पटकन होकारच देईन बहुधा...

उदयन, आपण स्वत: आपल्यापुरता खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे? कोणाचे काही नुकसान आहे का त्याने?
आणि मायबोली प्रशासनाने फोटो प्रकाशितच करु नका असे लिहिल्यासारखे का लिहिताय काहीजण?

खारीचा वाटा म्हणजे काय नेमके सांगा जरा..... परवानगी घेउन फोटो काढा की परवानगी घेउन सुध्दा गैरप्रकार होतात म्हणुन फोटोच काढु नका ??????

जरा स्पष्ट करा ..

काका Happy

शैलजा अगं तु जे म्हणतेस तेच करु नये अस्ं म्हणताहेत सगळे...

बाय द वे... माझा जो मुद्दा होता तो मी क्लिअर केला आहे माझ्या परिने.. उगाच अर्धवट ज्ञानावर भलती भिती दाखवू नका.

बाकि ज्यांना फोटो टाकायचे आहेत त्यांनी टाकावेत, ज्यांना डीलिट करायचे आहेत त्यानी करावेत. कुणालाही त्यांना अडवण्याचा अधिकार नाहिये.

आणि इथे काहि जणींचा असा गैसमज झाला होता की मला तो उद्योग कसा करायचा हे जाणुन घ्यायचे आहे.. तो कृपया दूर करा.

तुमचा,
विचित्र नग ( हेच लिहिलं होत ना, टी पार्टी पार्ले वर?? )

ललिता, तू (इथे तू स्वतःचे उदाहरण दिलेस म्हणून, तेच वापरते) सुशिक्षित आहेस, तेह्वा, तू जेह्वा हो म्हणशील तेह्वा तो होकार तू विचार करुन द्यावास, हे योग्य नाही का? किंवा अशिक्षित व्यक्तीपेक्षा तुला ह्यातेल संभाव्य धोक्यांची अधिक जास्त कल्पना असू शकते ना?

मग हो म्हणाल्यास तूही जबाबदारी उचलते आहेस. (आदित्यचा फोटो ह्याच कारणाने तुला पाठवला Happy मी प्रकाशित केला नाही ) कोणीच इथे ही फूलप्रूफ सिस्टीम आहे असे म्हणत नाहीये, पण काही प्रमाणातली प्रीकॉशन अहे असे काहीसे.

नील, काहीतरी गोंधळ होतोय का? Happy

हे प्रश्नचे उत्तर नाही झाले शैलजा...........

प्रश्न जे उचलतात त्यांनाच उत्तर द्यावे लागते..... उत्तर विचारल्यवर पुन्हा तुम्ही काय कराल नाही असे विचारण्या पुर्वी तुम्ही प्रश्न उचललात तर काय उत्तर अपेक्षित आहे हे आधी सांगावे लागते..

नुसते केजरीवाल होउ नका हो Happy

Pages