ब्लू अम्ब्रेला -- एका छोट्या मुलीच्या मनाचा संवेदनशील आणि मेच्युअर प्रवास

Submitted by मी मी on 9 February, 2014 - 09:21

भारतात चांगल्या कलाकृतींना जीवन नाही अस मला सतत वाटत असतं. इथल्या लोकांची कलागुणांची पारख कमी पडतेय कि मुळात कलागुणांची आवडंच नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण असे आहे खरे …. आणि फिल्म च्या बाबतीत हे पूर्वीपासून घडत होते त्याहीपेक्षा आज ते त्याहीपलीकडे अजीजीने घडत आहे. म्हणुनच कदाचित 'The ship of theseus' सारख्या दर्जेदार फिल्म भारताच्याच निर्मात्यांना भारतात रिलीज करावा वाटत नाही. त्यासाठी कोणीतरी (किरण-आमिर खान) विशेष प्रयत्न घेऊन आपल्यासाठी म्हणून रिलीज करतात आणि इतकं होऊनही परदेशात गाजलेला सिनेमा त्याच्याच देशात भारतात चक्क आदळतो आणि वाईटटट आदळतो. (The ship of theseus बद्दल परत कधीतरी लिहेन…. आता जरा वेगळा विषय)

मला ना सतत अश्या सिनेमांच अप्रूप वाटत राहतं आणि १०० - २०० कोटींच्या घरात जाऊन गाजलेल्या सिनेमांपेक्षा या अश्या अप्रतिम असूनही दुर्लक्षित राहिलेल्या सिनेमांबद्दल कमालीचं आकर्षण कायम होत जातं…. हेच कारण असेल कि माझ्या झोळीत हिट नसूनही निव्वळ उत्कृष्ट दर्जेदार कलाकृती असणार्या फिल्म चा साठा आहे आणि सटर-फटर सिनेमे करोडोंच्या घरात खेळतात तेव्हा मनाला कुठेतरी बोचऱ्या जाणीव होतात. अश्याच कुठल्याश्या अप्रतिम पीस ऑफ सिनेमा ला आपण मरतांना पाहिलेलं असतं… आणि त्या फिल्म च्या पाठी असणाऱ्या संपूर्ण युनिट ची निराशा अश्या वेळी डोळ्यासमोर दिसत राहते. …… असो

हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे नाव चर्चेत राहूनही फारसा न गाजलेला न चाललेला परंतु आपण पाहिल्या नंतर आवर्जून बघाच अस प्रत्येकाला सांगावं वाटावं तशी इच्छा व्हावी अशी अप्रतिम कलाकृती असलेला हलका फुलका संवेदनशील सिनेमा 'ब्लू अम्ब्रेला' .एका मित्राने आठवण करून दिली आणि आधी पाहिलेला असूनही मागल्या आठवड्यात पुन्हा पाहिला … सिनेमा पाहतांना आणि त्याचं सुंदर सुरेल गाणं ऐकतांना पुन्हा एकदा त्या चिमुकल्यांच्या इवल्याश्या भावविश्वात रमून व्हायला झालं.

images (1).jpg

सिनेमाची कहाणी अगदी साधारण आहे पण तरीही दिलखेचक आहे. हिमाचल प्रदेश मधले रम्य असे लोकेशन, डायरेक्शन, पीक्चरायजेशन आणि ११ वर्ष वयाच्या एका गोड मुलीचा अभिनय तिचे भावविश्व हे सगळं न्याहाळतांना आपण कधी आत आत निघून जातो आणि त्या लहान मुलांच्या विश्वामधलेच एक बनून राहतो कळतही नाही. पंकज कपूर सारख्या कसलेल्या कलाकाराचा अभिनयसुद्धा त्या सोबत अनुभवायला मिळतो हे म्हणजे बोनसच.

एका पहाडी पाड्यावर राहणारी गोंडस, खोडकर मुलगी बिंदिया एकदा तिला एक जापनीज छत्री मिळते. (कशी ते सिनेमातच पाहावे) गावात कुणीही या पूर्वी तशी छत्री पहिली नसते. आणि मुख्य म्हणजे बिनिया या छत्री सोबत प्रचंड खुश असते. हि ख़ुशी आणि ती छत्री बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच पाड्यातला एक व्यापारी नंदू त्याला ती At any cost हवी असते. पुढे या दोघांची ओढा ताण सुरु होते आणि अश्यात सिनेमा एका छोट्या मुलीच्या मनाचा संवेदनशील आणि मेच्युअर प्रवास आपल्या घडवत राहतो.

२००७ साली आलेला विशाल भारद्वाज चा हा सिनेमा त्यांच्या बेस्ट सिनेमांच्या यादीत अग्रगण्य आहे. पटकथा,संवाद आणि संगीत विशालचच… कुठेही अतिशयोक्ती नसलेली उगाच रंजक म्हणुन जादुगिरी किंवा स्वप्नील विश्व नसलेली अतिशय नैसर्गिक आणि आसपास घडणारं, जवळचं वाटणारं असच सारं यात असल्याने सिनेमा मनात बसतो. त्यात म्युजिक आणि गाणी तोडीची आहेत गुणगुणायला लावणारी आणि मनात रेंगाळणारी आहेत. गाण्याचे बोल देखील अप्रतीम आहेत.

http://www.youtube.com/watch?v=3l2ppvz0SN0

मारधाड, रक्तरंजन अश्या सिनेमांना कंटाळला असाल किंवा खरच काहीतरी चांगलं पाहण्याची उर्मी मनात असेल तर 'ब्लू अम्ब्रेला' नक्की बघा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स्स्स... आनंदयात्री!!!!! बर झाल सांगितलस... नाहीतर आठवेपर्यंत डोक्याला भुंगा लागुन राहिला असता!! :ड

आणखी एक लहान मुलाचा इराणीच चित्रपट होता. त्याचा बूट फाटका असतो, बहिण व तो आलटून पालटून घालत.
नाव विसरले. कोणाला आठवतं?

पण हे असे सर्व चित्रपट संग्रही ठेवून कधीही बघितले तरी कंटाळा न येण्यासारखे आहेत.

धन्यवाद नताशा. बरोबर .. नाहितर मी दिवसभर विचार करत बसले असते.

--------------

इरानी मूवी खूप साधे, सुंदर सरळ वाटले मला जे काही पाहिले ते. अलीकड्चाच मी पाहिलेला इरानी मूवी सेपरेशन सुद्धा छान होता. (नुकताच पाहिला म्हनून लक्षात). खूपच टचींग होता.

हे सहज आठवले म्हणून इथे ह्या धाग्यावर लिहिले.(अश्या मूवींचा संग्रह करायल अहवा)

सगळे गुडीगुडी, चांगले-चांगले प्रतिसाद हवेत का? पब्लिक फोरमवर तुम्ही काहीही प्रसिध्द केलेत की बर्‍यावाईट प्रतिक्रिया येणारच कि हो.>>>>>>>>>>>. फकीर गुडी गुडी लिहा अस मी कुठे आणि कधी म्हणाले? मायबोलीवर लिहायला आता लागले असले न तरी मागल्या अनेक वर्षांपासून वाचन करतेय बरं चुकीच्या लिखाणासाठी इथे लगेच कान धरतात हे काय माहिती नाहीये होय मला … वर दिलेल्या प्रतिक्रिया आहेत हे विसरू नका.

आणि दुसरा सिनेमा अस सारखं म्हणताहेत दुसरा सिनेमा म्हणजे कुठला ? मी माबो वर बर्याच सिनेमांबद्दल लिहिलंय नेमक्या कुठल्या सिनेमा बद्दल बोललं जातंय हे ??

चिल्ड्रन ऑफ हेवन पाहिलाय मी छान आहे सिनेमा थोडा संथ गतीने जातो अस वाटतं बघतांना तेवढंच..

व्हाईट बलून मात्र बघायचाच आहे कधीपासून बघायचं चाललेलं …. आठवण करून दिली त्याबद्दल धन्यवाद कल्याणी अन आनंदयात्री Happy

विजय धन्यवाद तुमचे Happy Happy

(आता कुणाला कशासाठी धन्यवाद द्यायचे मी का धन्यवाद देतेय हे मी त्या व्यक्ती व्यतिरिक्त कुणालाही सांगणे लागत नाही) Proud

बरं झालं, आठवण करून दिलीस. माझा राहिलेला आहे हा बघायचा. हा, लिसन अमाया, पीपली लाईव्ह. थिएटरमधेच जाऊन बघायचे होते हे तिनही सिनेमे, नाही जमलं, अजूनही नाही पाहिले.

Pages