'' नुसती दारु''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 February, 2014 - 02:31

कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो

किती जरी तू लांबवशिल '' कैलास '' वेळ ''नसण्याची''
काळ गळ्याभोवतील दो-या खचित आवळत जातो

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो<<< व्वा व्वा

किती जरी तू लांबवशिल '' कैलास '' वेळ ''नसण्याची''
काळ गळ्याभोवतील दो-या खचित आवळत जातो<<< छानच

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो

व्व्वा. मस्त शेर झालाय.
शेवटचा शेर अधिक कदाचित मक्त्याच्या आग्रहामुळे किचकट झालाय, असे वाटते.

<<कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?<<

अफाट, कातिल शेर डॉक! __/\__

कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो

>> मस्त

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो..... अफाट !!!!!!

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?........क्या बात है !!

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?<<< कातिलच आहे हे अगदी

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळालेमी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?<<
छानच

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो

>> लै म्हणजे लैच भारी !!

अखेरचा शेर तखल्लुसाग्रही झाल्याचे जाणवते आहेच, समीरदादा म्हणतात तसं.
मतलाही मला जरा अनावश्यक 'स्पष्ट/ थेट' वाटला.

पण उपरोक्त दोन शेर निव्वळ अफाट्ट !!