भिजलो होतो मी तेव्हा

Submitted by जयदीप. on 3 February, 2014 - 09:08

भिजलो होतो मी तेव्हा
रडलो होतो मी तेव्हा

कोणी आले नाहि तुझे
झिजलो होतो मी तेव्हा

हसले होते नशिब जरा
फसलो होतो मी तेव्हा...

नव्हते दडपण वा चिंता
हरलो होतो मी तेव्हा

झाला होता स्पर्श तुझा....
घडलो होतो मी तेव्हा....

-जयदीप
९८.१९७९.१०.२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयदीप,
या गझलेतल्या कल्पना नीट समजत नाहीत.मतला स्पष्ट नाही.भिजणे आणि रडणे यातील परस्पर संबध व तेंव्हाचा कालसंदर्भ लागत नाही.

जयन्ता५२