डॉ .वाघमारे आणि डॉ.साळी या मित्रांनी व्ही, आर . एस .घेतली तेव्हा..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 February, 2014 - 06:49

डॉ .वाघमारे आणि डॉ.साळी या डॉ न मित्रांनी आज व्ही, आर . एस .घेतली
त्या निमित्ताने

डॉ. साळी
माझ्या जीवन रसिक मित्रा
जवळ जवळ १२ वर्ष झाली
आपल्या पहिल्या भेटीला
तेव्हा तू मला वाचवले होते
उगाचच सणककेल्या
बॉसच्या तावडीतून
कामाच्या पहिल्याच दिवशी...
तेव्हापासून
तुझा प्रत्येक सल्ला
मला वाचवत होता
मार्ग दाखवत होता
सहज बोलता बोलता
मला खूप काही देत होता
या जीवनात अनेक लोक भेटले
त्याच्या जगण्याचे
अनेक स्तर होते काही वरवरचे उथळ
काही खाना पिना मजा करना या पंथाचे
तर काही मध्यम
घरादाराच्या चाकोरीत गरगर फिरणारे
तर काही खोलवर
जीवनाच्या गाभ्याला भिडणारे
आनंदाचा सुगंध दशदिशात पसरवणारे
सुखाच्या छोट्या छोट्या
क्षणातून जीवन जगणारे
असे जीवन जगणारा
क्वचित कु णी असतो
तो तू आह्र्स मित्रा
असे मी निश्चितपणे सांगू शकतो
तुझ्या सोबत असतांना
कंटाळा कधीही खोलीमध्ये
प्रवेश करू शकला नव्हता
तुझ्या व्यक्तिमत्वाचा
एवढा प्रभाव होता
मला माहित आहे
जीवनावरील तुझ्या अदम्य प्रेमामुळेच
कालपुरुषा ला ही गुंगारा देवून
आलास तू सहज पणे फसवून
त्या तुझ्या खोचक खट्याळ
बोलण्यात गुरफटून
तुझ्या संगतीची उणीव
नेहमीच भासत राहील
मित्रा .
पंजाबीत म्हणतात तसे
म्हणतो
तुसि ग्रेट हो पापे !!!!

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

डॉ .वाघमारे

तसे हे रुग्नालयही
एक रंगमंच आहे
ज्यात सारे कर्मचारी
आपापली भुमिका
चोख बजावतात

आपल्या वाट्याला
आलेल्या भूमिकेने
रंगमंच सुंदर करतात
अस्तित्वाने
जान आणतात
या सेवाभावी कामात
कुणी इथे काही आठवडे, महिने
वा काही वर्ष राहतात
तर कुणी वर्षोनुवर्षे टिकतात
इथल्या अस्तित्वाचा
अविभाज्य होतात
जुनाट वटवृक्षागत

थोडे जोकर थोडे व्हिलन
थोडी राजकारण
थोडी बलिदान
इथेही घडतात
काही रडणे काही हसणे
काही रुसणे काही फसणे
रंगमंचाचे नियम असतात

पण मुख्य भूनिका
वाट्याला येणे
हे खरोखर भाग्य असते
अर्थात ते एक
काटेरी सिंहासन असते
कारण तिथे बसल्यावर
आपण ज्यांना आपले मानले
ते ही परके होवून जातात
कालचे मित्र शत्रू होतात
आणि फोलपण त्या
सही शिक्याचे
मनी ठसवून जातात
खरच ही भूमिका वठवणे
खूपच अवघड असते

संवेदनशील स्वाभिमानी लोकांसाठी
ती एक शिक्षाच असते
मग ते मनस्वी राजे ठरवतात
झुगारून देणे
तो काटेरी मुकुट
कायमचाच
आणि धरतात आपला मार्ग
मुक्त कलंदर जगण्याचा

मित्र हो आपल्या समोर
आपले असेच कलंदर मित्र
बसले आहेत
उतरवून आपला काटेरी मुकुट
ते आपल्यात आले आहेत
आपण त्यांना निरोप
द्यायला नाही तर त्यांचे
स्वागत करायला आलो आहोत

wel-come back मित्रा !!

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users