पुणे व्हाया बिहार - koNee paahilaa aahe kaa

Submitted by वेल on 3 February, 2014 - 05:03

पुणे व्हाया बिहार - अनेकांचा लाडका उका आणि एक गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे - पाहिला का कोणी?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

jaaI <<'प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं,' या न्यायानं विचार केला तरच चित्रपटातून आनंद मिळण्याची अपेक्षा आपण धरू शकतो. >> asa lihilay. mhaNaje thoDakyaat Doka gharee Thevoon paahaa

कुठेही पॅरा न पाडता केलेल्या परिक्षणामुळे ( वाचनामुळे) डोळे गरगरले. काही दिवसानी युपी भैय्या आणी मराठी मुलगी अशा प्रेमाचे पण चित्रपट येतील, नाव असेल भैय्या हुई गवा हमार सैय्या.:खोखो:

अतिशय फालतू चित्रपट. परिक्षण करण्या योग्य ही नाही। उकाचे नाव वाचुन गेलो। अर्ध्यातच पळुन जावेसे वाटत होते। कसेबसे बसून राहिलो संपेपर्यंत।

अजिबात जाऊ नका।।।।।।।।

एनीवेज, आता आलेय इथे तर दोन ओळी लिहुनच टाकते. अभिनय प्रत्येकाने त्याला जमेल तसा केलाय. नाव ठेवण्यासारखे वाईट काम कोणी केले नाहीय. भरत जाधव मला सगळ्यात जास्त आवडला. त्याच्या इमेजबाहेर जाऊन त्याने प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वीही झालाय. मुळची स्टोरीच सिरीयसलि घेतलेली नसल्याने त्याच्यावर उभा केलेला डोलारा पोकळ आहे. त्याला अभिनेते काय करणार?

नावेच ठेवाय्ची झाल्यास असंख्य जागा आहेत पण ते सगळे लिहिले बसले तर ते चित्रपटाचे परिक्षण न होता अ आणि आ मधली लेखमाला होईल.

बाकी... उमेश कामतच्या फॅन्सनी चित्रपटाकडे अजिबात फिरकु नका. माझ्या घरातला फॅन बंद पडता पडता वाचला पण तसा संयम इतर फॅन्सही दाखवलीतच असे अजिबात नाही. हे धाडस करु नकाच असा माझ्या घरातल्या फॅनचा इतर फॅनमंडळींना संदेश आहे.

अबीर म्हणुन उका जो दिसलेला तो दुर्दैवाने परत दिसला नाही Sad Sad सध्या चालु असलेल्या मालिकेतही तो तुपकट वकिल दिसतोय. अबीर दिसेल या आशेने मी एक एपिसोड पाहिला होता आणि गतस्मृतीत रमणेच जास्त योग्य ह्या निष्कर्षाला आले होते. या चित्रपटानेही त्याच निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले.

आम्ही जो शो पाहायला गेलो होतो तिथे अर्ध्या तासानंतर सुबोध भावे, अजिंक्य देव व मृणाल कुलकर्णीचा " रेनी डे" होता. त्याचे परिक्षण आणि पुतेबिचेही परिक्षण घरी आल्यानंतर वाचल्यावर आज आयुष्यात पहिल्यांदाच परिक्षण न वाचता चित्रपटाला गेल्याबद्दल स्वतःला शेलक्या शिव्या हाणल्या. तोही उत्तरा र्धात ढेपाळलाय असे लिहिलेय परिक्षणा त पण निदान त्याच्या तांत्रिक बाजुंबद्दल तरी दोन ओळी चांङल्या लिहिलेल्या आहेत. पुतेबि मध्ये सगळाच आनंद.....

सईताई आणि अजिंक्यदेवचा "शशी देवधर" हा चित्रपट येतोय त्याचा ट्रेलर पाहिला . पाहताना ही स्टोरी आधी कुठेतरी वाचलीय असे वाटत होते, पण ट्रेलरवरुन चित्रपट प्रॉमिसिंग वाटला. रिलीज झाल्यावर नक्कीच पाहिन. मला सस्पेन्स पाहायला आवडतो Happy ,