वादळे होणार आता

Submitted by जयदीप. on 1 February, 2014 - 02:45

मोकळा नाही अता मी
शोधतो आहे मला मी

रिक्तता कवटाळते मग
एकटा होतो पुन्हा मी

राहतो त्यांच्यात मी पण
वेगळा आहे तसा मी

वादळे होणार आता
वाहती झालो हवा मी

ते मला सोडून गेले....
संपली माझी गुलामी !

-जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपली माझी गुलामी !<<<

ही ओळ ह्या गझलेच्या जमीनीच्या संदर्भात टेक्निकली करेक्ट ठरणार नाही. Happy

वादळे होणार आता
वाहती झालो हवा मी<<< चांगला शेर!