आ़जही ह्या वाटेवर...

Submitted by kishorbpanchal on 9 December, 2008 - 09:39

आ़जही ह्या वाटेवर...
दिवे तेच जळ्तात
असतात प्रखर तशेच ते
मजमात्र पुसट दिसतात
रातांधळी नव्हे ही
आहे एक धुंदी
ह्या धुंदीवरच मात्र
पाऊले ही चालतात....

गुलमोहर: 

किशोर , दोन दिवसा आड कविता टाकली तरी चालेल.

हा.......हा....

सध्या जुन्याच टाकत आहे, नविन केल्यावर २-२ दिवसांना टाकेन.
Happy

KISHOR B. PANCHAL

एक ब्लॉग घेऊन टाका ना सरळ ..

मस्त. कवीच्या धुंदफूंद मनःस्थितीचे अप्रतिम चित्रण.

--
.. नाही चिरा, नाही पणती.

पांचाळ सर,

स्वतःचा ब्लॉग असावा ही कल्पना वाईट नाही. पण इथेही टाका. कविता टाकायला आणि वाचायला फार वेळ लागत नाही. शिवाय वाचायची की नाही हा चॉईस प्रत्येकाला आहेच.

किशोरजी, स्वतःचा ब्लॉग असणे केव्हाही चांगलेच. पण इथे कविता टाकणे अत्यावष्यक आहे. इथे काही नतद्रष्ट आहेत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. इथे काही खुप चांगले आणि मदत करायला तयार असलेले उत्कृष्ट कविही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाच्या तुमच्या माझ्यासारख्या नविन लोकांना खुप उपयोग होण्यासारखा आहे. तुम्ही लिहीत राहा. छान लिहीताय, सुधारणा आवश्यक आहे ती आपोआप होत राहील.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com