विपश्यना - काही प्रश्न

Submitted by विजय देशमुख on 28 January, 2014 - 20:35

विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्‍याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.

१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्‍या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
४. ज्यांना रोज काही औषधे घ्यावी लागतात (उदा. रक्तदाब, डायबेटिस, इ.) त्यांच्यासाठी काही विशेष सुचना.
५. या शिबिरातुन कोणत्या अपेक्षा असाव्या/ असू नयेत.
६. इतर काही माहीती.

येत्या मार्च महिन्यात १० दिवसांच्या कोर्सला जायचे ठरतेय. बघुया, कसं जमते ते.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का?

फक्त केंद्रांची क्षमता कमी जास्त आहे तेवढाच फरक.

२. या शिबिरात शिकवल्या जाणार्‍या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?

विपश्यनेमधील ध्यान प्रकार काही वेगळा नसतो. तेव्हा तो बाहेर सांगितला तरी फरक पडत नाही.

३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...

साधे कपडे सोबत घेऊन जा. विशेष कपड्यांची गरज नाही.

४. ज्यांना रोज काही औषधे घ्यावी लागतात (उदा. रक्तदाब, डायबेटिस, इ.) त्यांच्यासाठी काही विशेष सुचना.

शिबिरात औषधाबद्दल आधीच माहिती द्यावी लागते.

परिचयातील काहींचा अनुभवः
जे इन्ट्रोवर्ट आहेत, त्यांना विपश्यनेचा फायदा होण्यपेक्शा त्रास झाला..मेडिटेशन ने मन मोकळं झालं नाही तर अजुनच विचार मनात गर्दी करून त्याचा त्रास झाला.. परिणामी ते विपश्यना अर्धी सोडुन परतले..

.

हे विकतंचं दुखणं नाही का वाटत...... म्हणजे प्रथमदर्शनी वरवर :स्मितः

त्यापेक्षा लँडमार्क फोरम काय वाईट???

कोणी हे केलेलं आणि फायदा झालेलं तरूण आहे का??? माझ्ह्या ओळखितले तीन चार रिटारयड आहेत इगतपुरीला जाऊन आलेले त्यंना काहीच पॉझिटिव्ह फरक नाही पडला.....

नक्की काय टेक्निक आहे हे????

दहा दिवस संपूर्ण आर्य मौन ठेवायची मानसिक तयारी करून जा. ते नसल्याने लोक ढेपाळतात.

कपडे सैलसर, आरामदायक असलेले चांगले.

तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पिंगू यांनी दिलीच आहेत.
मी १० दिवसांचा विपश्यनेच कोर्स इथे टेक्सासमध्ये केला होता ११ वर्षांपूर्वी. मला स्वतःला मौन पाळायचा काही त्रास वगैरे झाला नाही. परत आल्यावर पण बडबड करण्याऐवजी गप्पच बसावं वाटलेलं Happy

फायदा व्हावा अशी इच्छा असेल तर १० दिवस विपश्यना करून भागणार नाही. ते काही वन टाइम क्युअर नाही. कोणतेही मेडिटेशन हे जीवनाचा भाग झाल्याशिवाय त्याचा फायदा होत नाही असं माझं मत आहे.

विपश्यनेला अवश्य जा पण जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे तुम्ही पूर्णपणे कायापालट होउन समूळ बदलून जाल अशी अपेक्षा ठेउ नका.
एंजॉय! Happy

या ध्यानपद्धतीची माहिती बाहेर सांगू नये असं सुचवलं जातं कारण अर्धवट माहिती पसरण्याची शक्यता असते. आणि दहा दिवस दुसरं कुठलंही व्यवधान नसतांना शिकणं आणि रोजच्या दिनक्रमात हे शिकणं यात नक्कीच फरक आहे.
एक फुकट सल्ला - मौन, पहाटे लवकर उठणं रात्रीचं जेवण नसणं अश्या गोष्टींचा फार बाऊ करू नका. तिथे दोन दिवसात आपण या सगळ्याला सरावतो, काहीही त्रास होत नाही नंतर.
त्यांच्या वेबसाईटवरही बरीच माहिती उपलब्ध आहे.

सर्वांना धन्यवाद.

अल्प आहार, सकाळी उठणे, १० दिवस मौन, याचा फारसा त्रास होणार नाही याची खात्री आहे. खरं तर १० दिवस शांततेची गरज आहे. Wink
शुम्पी, पियु, गौरी +१.
ध्यान याबद्दल बरच काही ऐकलं आणि वाचलं आहे, पण सुरुवात कशी करावी, त्यातल्या काही तांत्रिक बाबी प्रत्यक्ष शिकणे गरजेचे वाटतेय. त्यासाठी विपश्यना शिबिराचा फायदा होईल, असे वाटते. एकदा सुरुवात झाली की पुढे सकाळी लौकर उठणे, ध्यान करणे, हे आपोआप सोपे जाईल.
गौरी - सल्ला आवडला. धन्यवाद.
शुम्पी - लगेच फरक पडेल, असे नाही पण किमान सुरुवात तरी होईल.
भुंगा- माझ्या माहितीत संदीप माहेश्वरीच्या एका व्हिडीओत त्याने वरेचसे डीटेल अनुभव दिले आहेत, ते खुप अद्भुत वाटले. त्याने पुढे एक यशस्वी उद्योजक म्हणुन नाव कमावले आहेच. तसेच बरेचसे यशस्वी लोकं ध्यान करतात, त्यांनी कोर्स केला असेलच असेही नाही, पण काहीच फायदा झाला नाही, असे म्हणणे बरोबर वाटत नाही. कारण कोणीतरी आपल्याला रेडीमेड काही देईल, अशी काही व्यवस्था यात नाही, त्यामुळे तशी अपेक्षा न ठेवता जाणे योग्य.
ध्यान कसे करावे, हे शिकण्याचा माझा प्रयत्न इतकाच माझा उद्देश आहे.

पिंगू यांनी दिलेल्या उत्तरांशी सहमत.

विपश्यनेला जाण्याचा निर्णय तुमचा स्वतःचा असेल तर खाणे, झोपणे, बसणे, मौन .. अशा गोष्टींचा काही तितकासा त्रास होत नाही. स्वतःकडे पाहण्याची संधी एरवी कधी मिळत नाही, ती तिथं मिळते - हे नक्की.

शुभेच्छा.

विजय, जरुर जाऊन या Happy शुभेच्छा!

मौन पाळणे म्हणले तर कठीण, म्हणले तर फारच सोपे.
त्यामागचा हेतू समजुन घ्या, जोवर तुम्ही तुमची बाह्येन्द्रिये, बाह्य जगाकडून सतत काही प्रतिसादाच्या/क्रियेच्या अपेक्षेत ठेवता/ ती रहातात, तोवर आत्मचिंतन/आत्मावलोकन/ आत्मपरिक्षण अशक्य ठरते.
फार कमी व्यक्ति ही दोन्ही अवधाने एकत्ररित्या सांभाळू शकतात.
स्वतःशी (अंतरात्मा) संवाद करायचा तर बाह्य जगाकडचे लक्ष पूर्ण थांबवावे लागते. अवधान पूर्णपणे स्वतःकडे वळवावे लागते जे अशक्यप्राय असते.
पण ते करण्याची पहिली पायरी म्हणजे मौनसाधना, श्रवणेंद्रियेही निरव शांततेत नेणे, शरिराचि हालचाल श्वास घेणेसोडणे इतकीच मर्यादित करणे, हे केले असता, मन प्रचंड ताकदीने पुर्वेतिहासाकडे वळू पहाते अन बाहेर धावायला उद्युक्त करते, पण तो मनाच्या उद्रेकाचा मोजकाच काळ जर मनावर ताबा मिळविता आला, तर पुढचे सर्व सोपे होत जाते.
ही सर्व माझी स्वानुभवित मते आहेत. (मी विपश्यनेला गेलेलो नाहीये, त्यावरील पुस्तकेही वाचली नाहीयेत)

मलाही विपश्यना कोर्स करण्याची खूप इच्छा आहे पण समहाऊ मी त्यांच्या क्रायटेरियात अजून बसलेले नाही. माझे अ‍ॅप्लिकेशन दोन वेळा रीजेक्ट झाले.

असो.

थोडासा त्याच्यासारखाच पण केवळ तीन दिवसासाठीचा सायलेंस कॅम्प मी केला होता. पण तिथे ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटिज होत्या - तीन दिवस तीन वेगळ्या - ज्यात एक्मेकांशी बोलणे आवश्यक होते. तीन दिवसाचा माझा अनुभव खूप चांगला होता. खूप हलके वाटले, प्रसन्न वाटले. अजून काय अनुभव आला नाही सांगता येणार कारण मोठ्यानेच नाही तर मनातही बोलायचे नव्हते.

आजही कधी स्ट्रेस वाटला तर तिथे शिकलेले टेक्निक - मानसिक बडबद सुद्धा कमी करायचे - वापरून स्ट्रेस खूप कमी करता येतो आणी निर्णयाला फायदा होतो.

पण तो मनाच्या उद्रेकाचा मोजकाच काळ जर मनावर ताबा मिळविता आला, तर पुढचे सर्व सोपे होत जाते.>>>> +११११
कमी शब्दात छान समजावलंय लिंबुटिंबुजी..

विपशन्या एक आर्त अनुभूती

ध्यानम सरणं गच्छामी (पुर्वार्ध)

ध्यानम सरणं गच्छामी (उत्तरार्ध)

असे काही अगोदर चे लेख ही वाचा. त्यात ले काय घ्यायचे काय नाही हे शेवटी आपणच ठरवणार!

अरे व्वा, घाटपान्डेसाहेब, तुम्ही ही या लिन्का बघता? Happy
(नै, कारण विपश्यना वगैरे अजुन "प्रयोगशाळेत" सिद्धबिद्ध झाली असेल असे वाटत नाही, मग कसला हो तुमचा विश्वास बसायला? Wink )

श्री सत्यनारायजी गोयंका यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेले इगतपुरी स्थित धम्मगिरी विपश्यना केंद्र.
इथे लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही साधना करू शकतात अर्थात शरीराने तसेच मनाने तंदुरुस्त असणे महत्वाचे.
मी सुरुवातीला १२ वर्षाचा असताना ३ दिवसाचा व नंतर १० दिवसाचे शिबिर इगतपुरी मध्ये केलेले आहे.
अतिशय प्रसन्न वातावरण तसेच प्रशस्त आसन क्षमता असणारा विपश्यना विहार.
१० दिवस बाहेरील जीवनाशी संपर्क नसतोच. तसेच बाहेरील व्यक्तीस आत प्रवेश नसतो.
१० दिवस पूर्ण मौनव्रत धारण करावे लागते. फक्त तेथील आचार्यांशी आपण बोलू शकतो तेही अगदी मोजकेच.
पुस्तक, मोबाईल, न्यूजपेपर, व्यसन इ. वर १० दिवस संपूर्ण बंदी असते.
पहिले ३ दिवस अगदी पळून जावेसे वाटते.
शक्यतो सैल कपडे वापरावे.
प्रतिदिन ३/४ वेळेस प्रत्येकी २ तास याप्रमाणे साधना असते.
प्रतिदिन शरीराला पाहिजे तितकेच साधे जेवण. (रात्री उपाशी झोपावं लागत अस काहीहि नाही. )

लक्षात ठेवा १० दिवसाचा कोर्स हि प्रथम पायरी आहे. यामधून तुम्ही साधना/ध्यानधारणा कशी करावी याचे ज्ञान मिळते.
येथे १० , २०, ४५ आणि ६० दिवसांचे विपश्यना शिबीर भरविले जातात.

अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा.
http://courses.dhamma.org/en/schedules/schgiri

धन्यवाद, ललित जगताप.
का कुणास ठाऊक, पण विपश्यना किंवा तत्सम कोर्स करणे म्हणजे संसारत्याग करुन सन्यास घेणे, असा गैरसमज आहे. मी इथे काही लोकांना माहिती विचारली होती, तेंव्हा 'बरा आहेस ना' अश्या त्यांच्या प्रतिक्रिया होत्या. Wink

३ दिवसाच्या शिबिराचा 'सुरुवात' म्हणुन फायदा होतो का? म्हणजे पुढे घरीच ध्यान करता येईल, अश्याअर्थाने.

श्री. विजय देशमुखजी,
का कुणास ठाऊक, पण विपश्यना किंवा तत्सम कोर्स करणे म्हणजे संसारत्याग करुन सन्यास घेणे, असा गैरसमज आहे>> नक्कीच. परंतु माझ्यामते, संसाराचा रथ चालवण्यासाठी लागणारी अधिकची ऊर्जा ही ध्यानधारणेतूनच मिळते. आपण हेच विसरतो कि जितका शारीरिक व्यायाम हा शरीरासाठी महत्वाचा आहे त्याहीपेक्ष्या मानसिक व्यायाम, एकाग्रता, संतुलन हे अधिक महत्वाचे आहे.

३ दिवसाच्या शिबिराचा 'सुरुवात' म्हणुन फायदा होतो का? म्हणजे पुढे घरीच ध्यान करता येईल >>
सुरुवात तुम्ही ३ दिवसाच्या शिबिरापासून केल्यास चांगलेच परंतु १० दिवसाचे शिबिर नक्कीच करा. सुरुवातीला थोडा त्रास होईन पण त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच.

शुभेच्छा !

ओ बाबोऽऽ..... बघा बुवा. तुमची विपश्यना "पन्चतारान्कित अध्यात्म (वा अंधश्रद्धा) " ठरविली गेली नाहिये ना/ ठरविली जात नाहीये ना!
बघा हं http://www.maayboli.com/node/47542 विसरुनका नविन एपिसोड....

limbutimbu जी,
तुमच्या मनात शंका येणे सहाजिकच आहे.
मी याविषयी जास्त काही बोलत नाही, परंतु आपले शासन या शिबिरासाठी १० दिवसांची भर पगारी रजा देते. तसेच कर्मचार्यांसाठी शिबिरेही भरवली जातात. म्हणजेच अंधश्रद्धा नक्कीच नाही.

विपश्यनाला अजून गेलो नाहीये परंतू जेव्हा माझ्यासारखा कटकट्या माणूस दोन दिवस बाहेर टळतो( ट्रेकिंगवगैरे) तेव्हा घरची मंडळी सुखाने झोप घेतात.
शिवाय तीनचार महिन्यांत बाहेर न पडल्यास "अजून कुठेशी बेत जमत नाहीये का?" अशी आस्थेने चौकशी होते. दहा दिवस टळल्यास किती आनंद होईल या विचाराने हर्षवायु होईल मला.

विपश्यनाला अजून गेलो नाहीये परंतू जेव्हा माझ्यासारखा कटकट्या माणूस दोन दिवस बाहेर टळतो( ट्रेकिंगवगैरे) तेव्हा घरची मंडळी सुखाने झोप घेतात.>>
+१ ट्रेक बद्दल

नाही नानबा. हे विपश्यनेच्या मूळ तत्वांच्या विरुध्द होइल. जप्,प्राणायाम व इतर साधना यांना परवानगी नसते. नैसर्गिक श्वासावरच लक्श केंद्र्ति करुन पुधे जायचे असते.

मिपावर याविषयी काही उत्कृष्ट लेखमालिका वाचल्या होत्या.
http://www.misalpav.com/node/27354 - यातच पुढच्या लिन्का मिळतील.

कवितानागेश यान्चीही एक खुसखुशीत भाषेत लेखमालिका आहे यावर, मिपावर
http://www.misalpav.com/node/15515

विपश्यना चालू असताना जप केला तर चालतो का?>>>>>>> नाही.
हे विपश्यनेच्या मूळ तत्वांच्या विरुध्द होइल. जप्,प्राणायाम व इतर साधना यांना परवानगी नसते. नैसर्गिक श्वासावरच लक्श केंद्र्ति करुन पुधे जायचे असते.>>>>. अगदि बरोबर.
विपश्यना केल्यावर मनःशान्ती म्हणजे काय ते कळले आणि मन शान्त झाल्यवर शरिर हि अपोआप शान्त होते ह्याचा अनुभव घेतला. बरेच आजर (मानसिक आणि शारिरीक ही) कमी झाले .
१० दिवस ते सान्गतील तेच करायचे असे थरवुन गेले होते. आणि तसेच केले . तिथे असे पर्यन्त काही विशेश फरक पडला आहे असे वाटले नाहि. पण तिथुन गेट च्या बाहेर पडल्यावर जाणवले की स्वतःमधे काय बदल झाला आहे ...
सगळ्यानी करावा असा ध्यान कोर्स आहे.

Pages