Submitted by रसप on 28 January, 2014 - 01:15
मला मी पाहिले आहे तुझ्या डोळ्यात आयुष्या
स्वत:चा चेहरा बघशील का माझ्यात आयुष्या ?
तिची ओवी, तिची गाणी पुन्हा गाणार असशिल तर
मुखी दे घास माझा अन् भरड जात्यात आयुष्या
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी हवा असतो
नव्याने बाण आणावेस तू भात्यात आयुष्या
किती गझला मुसलसल बांधल्या आहेस माझ्यावर
कसे मांडू तुला मी एकट्या मिसऱ्यात आयुष्या ?
तुझ्याशी सख्यही नाही, तुझ्याशी वैरही नाही
म्हणूनच वाटतो आहेस तू नात्यात आयुष्या
तुझे रुसवे, तुझ्या खोड्या, तुझा संताप, तक्रारी
किती हकनाक होऊ खर्च आयुष्यात आयुष्या ?
....रसप....
२७ जानेवारी २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/01/blog-post_28.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्चांगली जमलिये!!
च्चांगली जमलिये!!
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी हवा असतो
नव्याने बाण आणावेस तू भात्यात आयुष्या
किती गझला मुसलसल बांधल्या आहेस माझ्यावर
कसे मांडू तुला मी एकट्या मिसऱ्यात आयुष्या ?
>>
हे दोन सर्वांत विशेष वाटले...गझल आवडली..
आवडली
आवडली
व्वा ! आवडली सगळीच.
व्वा ! आवडली सगळीच.
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी हवा असतो
नव्याने बाण आणावेस तू भात्यात आयुष्या <<< वा
तिची ओवी, तिची गाणी पुन्हा
तिची ओवी, तिची गाणी पुन्हा गाणार असशिल तर
मुखी दे घास माझा अन् भरड जात्यात आयुष्या
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी हवा असतो
नव्याने बाण आणावेस तू भात्यात आयुष्या
वा वा.... क्या बात है.
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी हवा असतो
नव्याने बाण आणावेस तू भात्यात आयुष्या
छान.
धन्यवाद ! अजून एक शेर जोडतो
धन्यवाद !
अजून एक शेर जोडतो आहे -
तुझे रुसवे, तुझ्या खोड्या, तुझा संताप, तक्रारी
किती हकनाक होऊ खर्च आयुष्यात आयुष्या ?
तिची ओवी, तिची गाणी पुन्हा
तिची ओवी, तिची गाणी पुन्हा गाणार असशिल तर
मुखी दे घास माझा अन् भरड जात्यात आयुष्या
मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी हवा असतो
नव्याने बाण आणावेस तू भात्यात आयुष्या
उत्तम…. 'भात्यात' लक्षात राहण्यासारखा.
गझल आवडली.
'भात्यात' आणि 'मिसर्यात'
'भात्यात' आणि 'मिसर्यात' सर्वात छान वाटले.