खरे खुरे स्नो फ्लेकस - बर्फाचे कण

Submitted by गोपिका on 27 January, 2014 - 17:44

हे फोटो डिसेंबर २०१३ चे आहेत...स्टँफर्ड ला स्नो झाला तेव्हा बल्कनि मध्ये ख्रिसमस ट्री ठेवले होते....मला स्नो फाल प्रचंड आवडतो....म्हणुन प्रत्य़़क्श बघण्या साठि बाल्कनि मध्ये गेले तर हा सुखद अनुभव मला बघायला मिळाला.तोच कॅमेर्‍यात कैद करण्याचा प्रयत्न केला....

हो प्रयत्नच...कारण, -१८ सि चि थंडि, त्यात हे स्नो फ्लेक्स इत्के छोटे अणि नाजुक कि, कॅमेरा हि लवकर फोकस होत नवता....एक मिनिट हि उभे राहणे अवघड होते.वेगवेगळ्या डिझाइन चे,हे फ्लेक्स..स्नो फ्लकेस बद्दल विकिपिडिया वाचण्याजोगे आहे....
खरच, काय त्या देवाचि कलाकरी, कण न कण इतके कोरिव बनवुन्,ते हवेत नाजुक तरंगत आगदि जमिनि पर्‍यंत व्यवस्थित पोचवणे....त्यचि खरि ताकत अशा गोष्टिंतुनच कळते....किवा असे हि वाटले, खरच स्नो फेरीज(टंकर बेल, द सिक्रेट्स ओफ विन्ग्स), असतिल का, अस प्रत्येक कण सुबक कोरुन त्याल फुंकर मारत असतिल....तुम्हाला आवडेल अशि आशा आहे
प्रचि १
snowflake0006.JPG
प्रचि २
snowflake0009.JPG
प्रचि ३
snowflake0010.JPG
प्रचि ४
snowflake0011.JPG
प्रचि ५
snowflake0012.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीले आहे. फोटोही छान! ..
मला आधी वाटायचे तो बर्फाच्या कणाचा आकार म्हणजे उगीच कवीकल्पना असते तसा आहे. पण खरोखरंच असा असतो बर्फ, हे कळल्यावर खूप आश्चर्य वाटले होते. Happy

आम्ही पडलो कॅलिफॉर्नियात. एकदाच ४एक वर्षापूर्वी लास वेगासला बर्फ पडला होता तो पाहीला होता. तेव्हाही असा आकार दिसला नव्हताच. Happy

मला आधी वाटायचे तो बर्फाच्या कणाचा आकार म्हणजे उगीच कवीकल्पना असते तसा आहे. पण खरोखरंच असा असतो बर्फ, हे कळल्यावर खूप आश्चर्य वाटले होते. >>>+१. डॉक्युमेंटरी पाहिली तेव्हा कळलं कसं बनतं वगैरे डीटेल्स.
फोटो छान.

मस्त Happy

मवा, लिंक दे ना डॉक्युमेंटरीची Happy असेच क्रिस्टल्स का बनतात ते मलाही जाणून घ्यायचंय. बरोब्बर ६ आर्‍यांचे आणि कंपाऊंड लीफ सारखे आहेत सगळे फ्लेक्स.

मस्त. आम्ही शिकागो जवळ पर्ड्युमधे शिकत होतो तेव्हा हे गोंडस स्नोफ्लेक्स भरपूर "सहन" केले आहेत. Wink
पण पहिल्यांदा स्नो पडताना पाहून जाम हरखून गेले होते मी.

संपादित.
आता आठवलं, लायब्ररीमधून मुलींसाठी सिडी आणली होती वॉटर सायकल बद्दल त्यात होतं. मी पाहते अजून काही निळाली लिंक तर देते.

बस्के +१
मला स्नो फ्लक्स खरे असले तरी असे डोळ्यांना दिसत असतील अस वाटल नव्हतं, सुक्ष्मदर्शकाखाली बघितले तर दिसत असतील असे वाटत होते.

गोपिका ... ,,फारच सुंदर फोटो आणि लिखाण ....दोन्ही.
सध्या अनुभवतीये स्नो फॉल!

काय मस्त.......असं काही प्रत्यक्षात असतं अशी कल्पनाच नव्हती !!

प्रतिसादा बद्दल, सगळ्यांना खुप खुप धन्स......
बस्के, तुमचा सारखेच मला हि वाटायचे.स्नो फ्लेक्स चे चित्र, पेंड्न्ट वगरे बघुन वाटायचे, कदाचित सांकेतिक चित्र असतिल (स्टॅन्डर्ड अस काहितरि....).पण मला हि तुमचा इतकेच नवल वाटले होते अणि म्हणुनच वेळ न घालवता, हे फोटोज घेतले....

बरोब्बर ६ आर्‍यांचे आणि कंपाऊंड लीफ सारखे आहेत सगळे फ्लेक्स.>>> जेवढि माहिति मला अहे, पाण्याचे जे,
molecule bonding (H2O),असते, ते षटकोनि असत अणि त्यमुळे,बर्याच प्रक्रियेतुन बाहेर पडत हे ६ आर्‍यांचे बनतात...जाणकार प्रकश टाकतिलच.शिवाय्,तापमानानुसार, कधि असे फ्लेक्स्,कधि नळि,कहि सुइ चा आकर धारण करतात...

गोपिका ... ,,फारच सुंदर फोटो आणि लिखाण ....दोन्ही.
सध्या अनुभवतीये स्नो फॉल!>> धन्यवाद मानुषि.मि मात्र टेक्सास ला आले आता....त्यमुळे, परत स्नोव पाहण्याचा योग कधि येतो याचि वाट पाहतिये Happy

H2O रेणू षटकोनी असू शकत नाही. बायवॅलंट ऑक्सिजन आणि मोनोवॅलन्ट हायड्रोजन ह्यामधले कोवॅलन्ट बाँड्स, दोन्हीमधलं कमी जास्त ताकदीचं इलेक्ट्रॉन शेअरींगमुळे निर्माण झालेलं हायड्रोजन बाँडिंग, पाण्याच्या असंगत आचरण वगैरेमुळे पाण्याचे क्रिस्टल्स षटकोनी बनत असावेत किंवा तापमान आणि आर्द्रतेवर अवलंबून असावे.

फारच सुंदर आहेत पण हे क्रिस्टल्स अगदी एका साच्यातून पाडल्यासारखे (स्टेडी तापमानामुळे असेल) Happy

Pages