तो परीक्षा घेत आहे, कळत आहे...

Submitted by जयदीप. on 25 January, 2014 - 07:17

घेतला होतास तेव्हा ध्यास माझा
वाटतो आता तुला वनवास माझा

संपलो मी जन्मल्यावरतीच येथे
होत आहे या जगाला भास माझा

संपलेल्या वादळांचा वेध घेतो
शोधतो आहे कुणी इतिहास माझा

घेतली असती उधारी आज मी, पण
संपला माझ्यातला विश्वास माझा

तो परीक्षा घेत आहे, कळत आहे...
राहिला होता किती अभ्यास माझा !

-जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घेतली असती उधारी आज मी, पण
संपला माझ्यातला विश्वास माझा

व्वा.
माझा एक शेर आठवला.

हा स्वतःवरचा तुझा विश्वास ढळणारा
सांगतो का मान्य तुजला बंधने माझी

धन्यवाद.

हा स्वतःवरचा तुझा विश्वास ढळणारा
सांगतो का मान्य तुजला बंधने माझी >>

व्वा ! Happy

धन्यवाद समीरजी, विनिताजी.
Happy