सासामुमो - २

Submitted by इंद्रधनुष्य on 24 January, 2014 - 08:50

सासामुमो - १

५,४०० फुटांवरील कळसुबाई म्हणजे महाराष्ट्राच एव्हरेस्ट तर ५,१४१ फुटांवरील साल्हेर हे गडकिल्ल्यां मधिल एव्हरेस्ट. समुद्रसपाटी पासुन वाघांबे साधारण १,५०० ते २,००० फुट उंचीवर असले, तरी साल्हेरच्या माथ्या पर्यंतची उंची बघुन छातीत नक्कीच धडकी भरते. आकाशाला भिडलेले परशुराम मंदिर म्हणजे साल्हेरचा कळस. पौराणीक कथां नुसार परशुरामाने इथे तप केले. परशुराम कृपेने निर्माण झालेल्या मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्या बागलाण प्रांताला वरदान ठरलेल्या आहेत.

१६७१ मधिल मोहिमेत शिवाजी महाराजांनी साल्हेर स्वराज्यात सामिल करुन घेतला. त्यामुळे संतापलेल्या पातशाहाने इखलासखानाला साल्हेरला वेढा देण्याचा हुकूम सोडला. पण या वेळी महाराजांनी गनिमी कावा बाजुला सारुन मुघलांशी थेट मैदानात युद्ध केले आणि सार्‍या जगाला मराठ्यांच्या युद्ध कौशल्याची प्रचिती दिली. या मैदानी युद्धातील विजया मुळे शिवाजी महाराज आणि मावळ्यांची जरब पार उत्तरे पर्यंत पसरली.

या शौरगाथांची उजळणी करता तरी हे आडवाटे वरिल ट्रेक केलेच पाहिजेत असे वाटते. पण दुसर्‍या क्षणी या दर्दी किल्ल्यां वर गर्दी होता कामा नये असेही वाटते. कारण, गर्दीला शिस्त नसते.

असो.

गुहेत उंदरांचा फारच सुळसुळाट होता. त्यांच्या पासुन बॅगेचा बचाव करण्यासाठी नविनने एक अफलातून कल्पना लढवली. या अभिनव कल्पने बद्दल नविनची सरदारकी काढून घेऊन त्याला 'सरजी' हा किताब बहाल करण्यात आला.

प्रचित्र १

गुहेत रात्रभर उंदरांची मॅरेथॉन सुरु होती. रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे पहाटे लवकर जाग आली. चहा, मॅगी करुन गडफेरीला निघालो.

प्रचित्र २

खरतर पहिल्या दिवशीच संध्याकाळी साल्हेर माथा फिरुन यायचा विचार होता. पण चढाईच्या अतीश्रमामुळे आम्ही तो बेत आज वर ढकलला... गुहेच्या मागुन वर चढत आम्ही परशुराम मंदिरा पाशी पोहचलो. एव्हाना सुर्व्या कासराभर वर आला होता. मंदिरा समोर क्लिक्क्लिकाट करण्यात बराच वेळ खर्ची पडला.

प्रचित्र ३

प्रचित्र ४

प्रचित्र ५ सालोटा

आम्ही ठरलेल्या वेळेच्या बरेच मागे होतो. गुहेत परतल्यावर झटपट आवरुन भुंग्याच्या ग्रुपचा निरोप घेतला. अब तुम्हारे हवाले गुहा साथीयो..

प्रचित्र ६

वाघांबेत न उतरता आम्ही गडाच्या वायव्येकडील साल्हेर गावात उतरणार होतो. गडाचा घेरा फार मोठा आहे. मागुन दरितून येणारा वारा आम्हाला पुढे पुढे ढकलत होता.

प्रचित्र ७

प्रचित्र ८ साल्हेर ते वाघांबे गाडी रस्ता

प्रचित्र ९

प्रचित्र १०

परतीच्या मार्गावर एकूण सहा दरवाजे लागले. त्यातील काही दरवाजे अजुनही बर्‍या स्थितीत आहेत. गडाचे पहिले तीन दरवाजे उतरुन आम्ही पहिल्या पठारावर आलो. इथुन गडाचा पश्चिमेकडील भव्य कातळकडा पाहुन भान हरपते.

प्रचित्र ११

प्रचित्र १२

प्रचित्र १३ साल्हेरचा घेरा

शेवटचा दरवाजा उतरुन खाली आलो की हनुमान मंदिरा शेजारुन एक वाट थेट साल्हेर गावात जाते. तिथुनच आम्हाला मुल्हेरसाठी जिपडं मिळणार होतं.

प्रचित्र १४

गड उतरुन गावात पोहचे पर्यंत दुपारचे बारा वाजुन गेले होते. गावातून आलेल्या एका टेंपोने आम्हाला मुल्हेर फाट्या पर्यंत सोडलं. मुल्हेर फाट्या वरुन उसाच्या ट्रकातून मुल्हेर गाव गाठलं... वाटेत हरणबारी धरणाच्या पाण्यावर डोलणारी उसाची शेती दिसत होती.

मुल्हेरगडाचा पायथा मुल्हेर गावा पासून पाच कि.मी. वर आहे. त्यामुळे आधी पोटोबा.. मग गडोबा या आमच्या धोरणाला अनुसरुन मटकची मिसळ आणि वडापाव वर ताव मारण्यात आला. दुपारच्या उन्हात गावा पासुन पायथ्या पर्यंत पाच कि.मी. चालत जाणे जिवावर आले होते. नविनने एका रिक्षावाल्या शंभर रुपयात पटवून पायथ्या पर्यंतची चाल कमी केली.

मुल्हेर आणि मोरागडची जोडगोळी दुपारच्या उन्हात आमची वाट पहात बसली होती. तो चढ बघुन पाय आपसुक दुखू लागले. आता नको नंतर जाऊ असा विचार सगळ्यांच्याच मनाला शिउन गेला. पण इथे वेळ काढण्यात अर्थ नव्हता. आधीच उशिर झाल्याने पुढचा प्लॅन फिसकटण्याच्या बेतात होता. दुपारी तीनच्या सुमारास भर उन्हात आम्ही मुल्हेर जवळ करु लागलो.

मुल्हेरच्या पहिल्या टप्प्यावर बर्‍या पैकी झाडोरा असल्यामुळे चढाई थोडीशी सुसह्य झाली. गावातील दोन-तीन तरुण मुल्हेर माचीवरिल बाबाच्या दर्शना साठी जात होती... वाटेतील गणेश मंदिरा पर्यंत त्यांची सोबत लाभली.

प्रचित्र १५ मुल्हेरमाची वरील गणेश मंदिराच्या पार्श्वभुमीवर दिसणारा हरगड

मुल्हेरमाची वरील सोमेश्वर मंदिरात आजचा मुक्काम होता. तसेही उशिर झाल्यामुळे आज मोरागड करणं शक्य नव्हतं.

मंदिरा समोर पार्क केलेली बाईक बघुन आम्ही केलेल्या तंगतोडीचा आम्हालाच राग आला. नविनने मंदिरातल्या बाबा कडुन रहाण्याची परवानगी मिळवली. मंदिरा शेजारी एक पाण्याच टाकं आहे पण ते पिण्यास उपयुक्त नव्हतं. बाबाची अनुमती मिळताच आमचा मोर्चा तिकडे वळला. त्या थंडगार पाण्यातील आंघोळीने थकलेल्या गांत्रामधे पुन्हा एकदा जोश निर्माण केला.

प्रचित्र १६ माचीवरुन दिसणार मोरागडाचा दरवाजा.

प्रचित्र १७ सोमेश्वरा समोरील गणेश

सुचिर्भुत होउन मंदिराच्या गाभार्‍यात सोमेश्वराच्या दर्शनाला गेलो.
प्रचित्र १८

गाभार्‍याची वाट जेमतेम एक माणुस जाईल एव्हढी अरुंद आहे. पंधरा फुट खाली उतरल्यावर शिवपिंडीचे दर्शन झाले. वरिल झरोक्यातुन येणार्‍या उजेडामुळे तिथे एक अद्भुत वातावरण निर्मिती झाली होती. सगळ्यांनी मिळुन एकच ओंकार केला. ओंकारच्या लयबद्ध जपाने गाभार्‍यातील वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाले. त्या अलौकीक शांततेतील तो ओंकाराचा नाद आजही कानात तसाच ऐकू येतोय. मन: शुद्धीची प्रचिती यावी अस ते वातावरण होते... केवळ अविस्मरणीय!

प्रचित्र १९

प्रचित्र २०

चहाची वेळ उलटुन गेली होती.. म्हणुन चहा ऐवजी सुप बनवण्यात आले. विनयने आणलेल्या ठेपल्यांच्या सोबतीला नविनने आणलेली मक्याची चटणी होती

प्रचित्र २१

प्रचित्र २२

संध्याकाळ समई मंदिरा समोरील परिसर अगदी निवांत भासत होता. बुलबुल पक्षांची किलबिल हळुहळु कमी होत गेली, तशी चुतुर्थीची रात्र आपल साम्राज्य पसरवू लागली.

प्रचित्र २३

जेवणाला एमटीआरचे रेडी टू ईट होते.. त्यामुळे कसलीच घाई नव्हती. जेवायला दोन तासांची उसंत होती. मंदिराच्या आवारात कॅरीमॅट पसरुन मावळ्यांच्या संसारीक गप्पा सुरु झाल्या :p

प्रचित्र २४
सासामुमो - ३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफलातून… पहिल्या भागाप्रमाणेच मस्त झालाय…. फोटोही झक्क्कास !!!

सगळ्यांनी मिळुन एकच ओंकार केला. ओंकारच्या लयबद्ध जपाने गाभार्‍यातील वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाले. त्या अलौकीक शांततेतील तो ओंकाराचा नाद आजही कानात तसाच ऐकू येतोय. >>>> मी नसलेल्या ट्रेकमध्येही माझी आठवण निघते हे वाचून भरून आलं रे Wink !!!

"मंदिरा समोर पार्क केलेली बाईक बघुन आम्ही केलेल्या तंगतोडीचा आम्हालाच राग आला."
म्हणजे, मुल्हेर माची पर्यन्त रस्ता तयार झालेला दिसतोय.

<< मावळ्यांच्या संसारीक गप्पा सुरु झाल्या >> <<नविनची सरदारकी काढून घेऊन त्याला 'सरजी' हा किताब बहाल>> Lol

मस्त वर्णन ! जल्ला इतक्या उंचीवर गेलात तर सुर्योदय तरी पहायचा ! कसले एवढे झोपत बसलात ! परशुराम मंदीरासमोर बसून पहाटेच्या धुंदीचा आस्वाद घ्यायलाच हवा.. दिसणारा नजारा अप्रतिम असतो !

५,४०० फुटांवरील कळसुबाई म्हणजे महाराष्ट्राच एव्हरेस्ट तर ५,५४१ फुटांवरील साल्हेर हे गडकिल्ल्यां मधिल एव्हरेस्ट>>>> लिहिताना काहि गडबड झाली आहे का रे?

बाकी सफर मस्तच सुरु आहे. Happy

५,४०० फुटांवरील कळसुबाई म्हणजे महाराष्ट्राच एव्हरेस्ट तर ५,५४१ फुटांवरील साल्हेर हे गडकिल्ल्यां मधिल एव्हरेस्ट>>>> लिहिताना काहि गडबड झाली आहे का रे?
>>> +१११

अरे साल्हेरचा घेरा झक्क्कास आलाय... तो फोटॉ मला जमला नव्हता घ्यायला Happy

एवढ्या मोठ्या घेर्‍याच्या किल्ल्याला ७५००० मोगल सैन्य वेढा देतं काय, आणि ६०००० मराठी सैन्य तो बाहेरून फोडून योजनाबद्ध काव्याने रण जिंकतं काय... सगळंच थक्क करणारं... मराठी सैन्याने मैदानात समोरासमोर मोगलांना पहिल्यांदा मात दिली ती याच साल्हेरच्या प्रदेशात... हे सगळं आठवत आठवत किल्ला फिरावा... आणि मनातल्या मनात शिवछत्रपतींच्या हाताखाली तयार झालेल्या झुंजार रणकौशल्याचं कौतुक करावं.. Happy

भारी वृतांत. पाचवा फोटो मस्त आहे. त्या तिथल्या अलिप्त गाभार्‍यातल्या ओंकाराने भारलेले वातावरण... भारी वाटले असणार.

हा भागही मस्तच Happy
सगळेच फोटो आवडले.

आनंदयात्री आणि इतरांनाही साल्हेरच्या लढाईचा इतिहास विस्ताराने लिहावा अशी विनंती करतो.>>>>>+१

हेम, शब्दात पकडले नाहीस तरी चालेल.. आधीच सगळा इतिहास शब्दांत अडकलाय... Happy

मैदानात म्हणजे, नेहमीच्या सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशातल्या जंगले, खिंडी, घाट, दर्‍याखोर्‍यांपेक्षा मोकळ्या सपाटीच्या भागात असं...
साल्हेरच्या चहुबाजूला राजगड-तोरणा-प्रतापगडासारखा डोंगराळ चढ-उताराचा प्रदेश नाहीये... मुख्य म्हणजे सह्याद्रीपेक्षाही संख्याबळावर अधिक भिस्त ठेवून लढली गेलेली ही लढाई होती...