गिर्यारोहणाचा धंदा

Submitted by सूनटून्या on 23 January, 2014 - 02:27

मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर तिथे इतर कुणी नसत तर या लोकांनी काय केल असत? या लोकांनी, आम्ही केलेल्या मदतीसाठी साध आभार प्रदर्शित करण्याच सौजन्य सुद्धा दाखवलं नाही. सकाळी उठले आणि तोंड वर करून निघून गेले. >>>> Use and throw !!! Angry

वरच्या लेखात लिहिलेल्या प्रॉब्लेम्सचा विचारच केलेला दिसत नाही त्या लोकांनी आधी. आत्ता तुम्ही सज्जन लोक्स त्यांच्या मदतीला गेलात म्हणून सगळं ठिक झालं.

खतरनाक अनुभव....मलाही इतका भयानक नाही पण जवळपास तसाच अनुभव आला अलंग-मलंग ला....
लवकरच त्याचा सविस्तर वृत्तांत टाकतोय.

सुनटून्या

अगदी योग्य वेळी योग्य विषयाला हात घातला आहेस. हल्ली प्रशिक्षित गिर्यारोहकांबरोबर जाण्याऐवजी रिस्क असलेल्या ठिकाणीही "आपले आपण जाऊ" या घातकी मानसिकतेमुळे अपघातांचं प्रमाण वाढू लागलं आहे. एका दिवसाच्या गिर्यारोहण शिबिरातून दोन चार नॉटस शिकल्या म्हणजे आपण लोकांची जबाबदारीही घ्यायला सक्षम झालो असा गोड गैरसमज तद्दन गल्लेभरू ग्रुप्समध्ये पसरलेला आहे. यामध्ये अनेक कायदेशीर बाबीही अंतर्भूत आहेत. काही अपघात झाल्यास ग्रुप रजिस्टर्ड आहे का… आउटडोअर एक्स्पर्ट लोकं Certified आहेत का इथपासून सुरुवात होते आणि हि बाब कायदेशीर दृष्ट्या अतिशय गंभीर होऊ शकते.

त्यात adenture ट्रेक्सला "एक्स्पर्ट (???) चार्जेस" च्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळून त्यात पुन्हा ग्रुपच्या संख्येवर बंधनं घातली जात नाहीत. ड्युक्स नोज रॅपलिंग सारख्या धोकादायक activity मध्ये एका दिवशी ७० लोक भरले जातात. यात एका दिवसात प्रचंड पैसा कमावण्याची हाव पुरेपूर भरलेली असते. जिथे थ्रिल आहे तीच ठिकाणं म्हणजे गिर्यारोहण असा समज असणा-या या बाजारू लोकांना सह्याद्री समजलेलाच नाही.

आज गिरीविराज,शैलभ्रमर इत्यादी प्रस्तरारोहणातील मानबिंदू असलेल्या संस्था या activities घेत नाहीत तर आपण अर्ध्या हळदकुंडाने पिवळे होऊन का म्हणून जोखीम पत्करतोय हा साधा विचारही या लोकांच्या मनाला शिवत नाही. तसंच कधीकाळी फक्त कसलेल्या आणि प्रशिक्षित प्रस्तरारोह्कांचं क्षेत्र असलेल्या सुळके चढाई मोहिमा आज अगदी सहजपणे आणि जथ्थेच्या जथ्थे घेऊन पार पाडल्या जातात. ताजं उदाहरण म्हणजे मागच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लिंगाणा ट्रेकच्या नावाखाली भरलेली जत्रा. एकाच दिवशी लिंगाण्यासारख्या कठीण ठिकाणी "आम्ही ७०० नवीन लोकांना लिंगाणा दर्शन घडवून आणलं" अशा भिकेचे डोहाळे लागलेल्या जाहिराती केल्या जात होत्या (७०० लोक = ८ शनिवार ८ रविवार x प्रत्येक बॅचमध्ये ३०-४० लोक. त्यामुळे १६ दिवस x ४० लोक) . गिर्यारोहणाचा बाजार आणि धंदा झाल्याचं उत्तम उदाहरण !!!

जर तिथे इतर कुणी नसत तर या लोकांनी काय केल असत? या लोकांनी, आम्ही केलेल्या मदतीसाठी साध आभार प्रदर्शित करण्याच सौजन्य सुद्धा दाखवलं नाही. सकाळी उठले आणि तोंड वर करून निघून गेले. >>>> बहुदा रेस्क्यू ग्रुप्स वाल्यांना या गाढवांनी गृहीत धरायला सुरुवात केली आहे. आपण एक फोन केला की हे लोक आपापले कामधंदे सोडून आपले पगारी नोकर असल्यासारखे येतील. आपल्यासारख्यांना सोडवणं हीच त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे आणि हि तर त्यांची "ड्युटी" च आहे. यात आभार ते कसले मानायचे ??? अशा भ्रामक समजुती आणि गरज सरो वैद्य मरो ही वृत्ती या तथाकथित "ट्रॅकर्स" मध्ये वाढलेली आहे. शनिवार रविवार "चलो यार xyz जगह hangout करेंगे" हीच त्यांच्या ट्रेकिंगची व्याख्या. फार मनाला लावून घेवू नकोस. उलट तू मदत केली नसतीस तर तुमच्या ग्रुपला "attitude" आहे आणि "हेल्पिंग नेचर" नाही अशी बोंब मारायलाही त्यांनी कमी केलं नसतं !!!

आपल्याला क्लाइंम्बिंग येत नसल्याने आपण ज्या ग्रुपबरोबर जात आहोत ते लोक तरी प्रशिक्षित आहेत का हेही पडताळून पाहायला हवं. अलंगला तू उल्लेख केलेला मुलीच्या केसाचा प्रसंग घडल्यास काय उपाययोजना करावी याचं ज्ञान या कमर्शिअल ग्रुपवाल्यांकडे अजिबात नसतं (पार्टीसिपंट्सच्या "केसाला धक्का" लागल्यास आपल्यावरही केस होऊ शकते हे या गॉनकेस लोकांच्या लक्षात येत नसावं !!) . त्यात आता पायथ्याच्या अत्यंत तोकडं ज्ञान असलेल्या वाटाड्यांवर पूर्ण भरवसा ठेवून लिंगाणा…सांधण,अलंग मदन,नळीची वाट इत्यादी जोखमीचे ट्रेक करण्याची नवीन फॅशन बाजारात आली आहे. गोठयात गुरांना दावणीला बांधायच्या गाठी हे लोक anchoring साठी वापरतात. ग्रुपवालेही प्रशिक्षित नसल्याने गाववाल्यांनी जो सेटअप लावला आहे तो चूक कि बरोबर हेही त्यांना समजत नाही. "एखादा माणूस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण लावलेला सेटअप बरोबर आहे" असली धोकादायक समजूत सध्या झालेली आहे. साध्या ठिकाणी ट्रेक्स नेणं हे कमीपणाचं लक्षण आहे असला असंबद्ध विचार करून हे लोक adventure ट्रेक्स च्या नावाखाली भरपूर पैसे उकळत आहेत. सध्या यावर कोणतीही शासकीय आणि कायदेशीर आचारसंहिता नसल्याने हे प्रस्थ आता हाताबाहेर गेलंय. अनेक अपघात होऊनही एक फॉर्म भरून घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली या गैरसमजुतीखाली हे लोक वावरत आहेत. या क्षेत्रातल्या सिनियर गिर्यारोहकांनी आता शासनाची मदत घेऊन एक कडक नियमावली तयार करावी.

अर्थात या सगळ्या प्रकारांमध्ये काही अपवाद नक्कीच आहेत की जे खरंच सुरक्षिततेबाबत कायम जागरूक असतात. आपण कोणत्या गटात बसतो हे ज्याचं त्याने ठरवावं.

ओंकार....ही पोस्ट फेबुवर शेअर व्हायला हवी...
जबरदस्त बोललायस
शतप्रतिशत सहमत....
याच एका ग्रुपबरोबर लिंगाणा करण्याचा बेत करत असून सुद्धा....
Sad

लुंग्यासुंग्यांनाही आजकाल ट्रेकिंगचा जोर येतो, प्रत्येकाचा फेबु छंद काय तर म्हणे... ट्रेकिँग...

सह्याद्रीमित्र

डोक्यात यासाठी जाते कारण सह्याद्रीचे स्थान आपल्यासाठी वेगळेच आहे. आपल्यासाठी तो फक्त दगड मातीचा ढिगारा नाही. इथल्या प्रत्येक दगडात आपला इतिहास सामावलेला आहे, आपल्याच बहाद्दर पूर्वजांच रक्त सांडलेल आहे. अशा ठिकाणी कोणी धंदा करायला लागला कि जीव तुटतो यार.

हल्लीच्या ट्रेकर्सना काही अपवाद वगळता इथल्या इतिहासाशी काही देणघेण नाही. किल्ल्यावर इंग्राजळलेल वातावरण पाहिलं कि आपण सह्याद्री मध्येच आहोत ना याचीच शंका वाटते.

आधी गिर्यारोहण हे वेड होत आता ते खूळ झालय > १००% सहमत.

ओंकारच्या पोस्टला पुर्ण अनुमोदन.... अरे गाठच काय रोप कोणता असावा हे सुद्धा ज्यांना कळत नाही अश्या संस्थां सोबत नविन लोक प्रस्तारोहणाला जातात.

माहुलीच्या वाईट अनुभवा नंतर मी अश्या गल्लेभरु संस्थां सोबत ट्रेक करण्याचे सोडुन दिले... नको ते अ‍ॅड्व्हेंचर.

सुनटुन्या.. कळकळ पोहोचली.

सकाळी उठले आणि तोंड वर करून निघून गेले. >>>>> Angry

सह्याद्रीमित्र, जबराट पोस्ट .

बापरे.

महत्त्वाचा विषय उघडल्याबद्दल धन्यवाद.

गिर्यारोहण सहली आयोजित करणार्‍या संस्था / गृप्सवर काही बंधनं घालणं आवश्यक आहे. नावाजलेले गिर्यारोहक अथवा कोणती प्रमुख संस्था असेल तर त्यांच्याकडून मान्यता मिळवणे बंधनकारक करता येणं शक्य आहे का?

स्वतः चा अनुभव नाही पण पेपर मधल्या जाहिराती च्या वाढत्या प्रमाणामुळे मनात हि अशीच धाकधूक वाटत होती.

एव्हरेस्ट्सारख्या शिखरांचाही टूरिस्ट स्पॉट झालेला आहे याबद्दल वाचले होते पण इथेही तोच प्रकार? कुठल्याही गोष्टीचे प्रमाणीकरण (standardization) न होणे, त्याला महत्वच न देणे यात आपला हातखंडा आहे.

वरील लेखातल्या सन्कटात सापड्लेल्या मुलान्च्या बाबतीत मला गम्मत अशी वाटते कि या लोकन्ना भीती कशी वाटत नाहि असे अविचार करताना ? का फक्त कुणाला impress करण्याच्या नादात ते असे करतात ?
निदान आपण दुसर्याचा आणी स्वतहाच्याही , जिवाशी खेळतो आहोत याचे तरी भान ठेवायला हवे.

बाकी ४०~४० जणान्च्या commercial ग्रुप बद्दल म्हणाल तर मला वटते कि त्यान्ना "ट्रेकला गेलो होतो" हे लोकान्ना सन्गायला मिळणे इतकेच अपेक्शित असते. ते rapling च्या जवळपासही फिरकत नसतील. लिन्गाणा background ला दिसेल असे २~४ फोटो मिळाले कि त्यान्चे काम झाले. त्यामुळे त्यान्ची काळजी ट्रेक arrange करणार्याला वाटत नसेल !
लोकान्नी सुट्टीच्या वेळात इतर काही उद्योग करण्यापेक्शा निसर्गाच्या सानिध्यात २ दिवस ते घालवतात हे चान्गलेच म्हणावे लागेल. कदाचित यातूनच ट्रेकिन्ग ची खरी आवड त्यान्च्यात निर्माण होइल !

पशुपत
४०-५० जणांचा ग्रुप नेउन आपण निसर्गाच्या जवळ कधीच जाणार नाही. निसर्ग अनुभवायचा तो शांततेत, एव्हड्या मोठ्या ग्रुप मध्ये ते शक्य नाही. एव्हढा मोठा ग्रुप नेउन आपण तिथल्या आधीच अपुऱ्या असलेल्या साधन संपत्तीवर जास्तीचा भार टाकतो.

चिंताजनक परिस्थिती आहे. लेखातील आणि ओंकारच्या प्रतिसादातील अनेक वाक्यांशी सहमत.

'फक्त फेसबूक फोटोसाठी' हे केवळ ट्रेकिंगमध्येच नाही तर दैनंदिन जगण्यातही यायला लागलंय..

its getting worse...

कपील शर्माचा एक विनोद आठवला - जुन्या काळी लोक म्हणत, 'नेकी कर और कुएं में डाल' आजचा तरुण म्हणतो, 'कुछ भी कर पर फेसबूक पे डाल'!

सुनटून्या
खरोखरच अगदी महत्वाचा विषय मांडला आहे.
१) एकूण सर्व प्रकार खेदजनकच आहे.

खरतर ट्रेकेर्स लोक जातात सह्याद्रित भटकंतीचा आनंद लुटायला. पण काही चंगळवादी लोक मात्र जातात ती आपली श्रीमंती दाखवायला. आणि ती दाखवून दुसर्‍याला हीन लेखायचे व त्यांना आम्ही तुमच्यापेक्षा किती (अति)‘शहाणे’ आहोत हे दाखवायचे. त्यांच्याशी नीट संभाषण करायचे नाही. उद्धटपणे बोलायचे अशा प्रकारने ती मंडळी दुखावली जातात. त्यामुळे एखादे वेळेस बाका प्रसंग सुद्धा अशा लोकांवर ओढवू शकतो, पण ते त्यांच्या मस्तीत असतात, कारण हेच चंगळवाद.

पण खरतर आपणच स्थानिकांना वाटयाडा म्हणून बरोबर घेतले पाहिजे, अर्थात ज्या ठिकाणी खरंच गरज असेल तेथेच, व त्यांना चार पैसे मिळतील असे पाहिले पाहिजे. असे अनेकजण करतही असतील. परंतू प्रश्न आहे तो गल्लाभरू मंडळींचा. ते फक्त स्वतःचाच फायदा बघतात. पण आता स्थानिकांना त्यांचा हा गल्लाभरूपणा कळायला लागला आहे. पण त्यामुळेच येणारे सर्वजण असेच असतात असा समज त्यांचा होऊ लागला आहे. अर्थात अशी परिस्थिति सर्वच ठिकाणी असते असे नाही. कारण आजकाल अनेक संस्था गिरिजनांना मदत करीत असतात. जसे औषधे, दप्तरे, वहया, पुस्तके इ. त्यामुळे सर्वच ठिकाणी गिरिजन पैसे मागतात असे नाही. काही काही ठिकाणीच असे होत असेल असे मला वाटते.
आणि त्याला कारण ही गल्लाभरू मंडळींच आहेत. हे सर्व ह्या गल्लाभरू लोकांना कधी कळणार आहे, हा प्रश्नच आहे.

२) अलंगवरचा प्रसंग वाचून तर अंगावर काटाच आला.

समजा तुम्ही तिथे नसता तर आणि किशोरने सांगितल्याप्रमाणे “काही मदत लागलीच तर आवाज द्या” असे सांगितले नसते तर, काय प्रसंग ओढवला असता त्या लोकांवर ह्याची कल्पनासुद्धा करवत नाही.
पण तुम्ही सर्वांनी जी काही मदत केली व त्या सर्वांची सुटका केली, हे वाचून हाडाच्या ट्रेकेर्स मंडळींना तुमच्याबद्दल अभिमानच वाटेल. कारण हे फक्त हाडाचे ट्रेकेर्सच करू शकतो.

भाव खाण्याकरिता वा इतरांसमोर फुश्यारक्या मारण्याकरिता जे ट्रेक करतात ते कसे वागतात हे तुंम्ही अनुभवले आहेच. “आंम्ही केलेल्या मदतीसाठी सांध आभार प्रदर्शित करण्याचं सौजन्य सुद्धा दाखवलं नाही. सकाळी उठले आणि तोंड वर करून निघून गेले.” असेच वागतात ही मंडळी. पण ह्याचा तुंम्ही जास्त त्रासही करून घेऊ नका आणि विचारही करू नका. कारण तुंम्ही अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे यात शंका नाही. ट्रेकेर्सच्या जातीला शोभेल असेच वागला आहात.
ह्या बाजारूवृतीच्या लोकांना काय कळणार सह्याद्रि ? त्याकरिता सह्याद्रिवर मनापासून प्रेम असावं लागतं. त्याच्या सान्निध्यात राहून त्याच्याशी एकरूप व्हावे लागतं.

प्रस्तरारोहणाची काहीही माहिती नसताना, केवळ एक – दोन ट्रेक करून स्वतःला (स्वयं घोषित) लीडर म्हणून घ्यायचे व ट्रेक (संपूर्ण माहीत नसलेले) आयोजित करायचे.
काहीजण तर आपण हे सहज करू. (खोटा मोठेपणा). बाकीचे विनाकारण भीती दाखवतायत असे समाविष्ठ मंडळींना भासवून (म्हणजेच बोल-बच्चन करून) अशा अवघड ठिकाणी, विनासाहित्य किंवा अपूर्‍या साहित्याने घेवून येतात आणि त्यामुळे त्यांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. मग भीतीने गाळण उडते, आणि त्यावेळी आपण सावध केल्याची जाणीव होते. पण काय उपोयोग? बैल गेला आणि झोपा केला, अशी गत होते. आणि गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागते. अश्या काही ग्रुप्स मुळेच सर्व ट्रेकेर्स मंडळी बदनाम होतात.

तो ग्रुप तुमच्याशी ज्या प्रमाणे वागला ते वाचून तर चंगळवाद बोकाळलाय असेच वाटते. नाहीतर त्यांनी नक्कीच तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असते.

नाहीतर ओंकार म्हणतो तसे त्यांना वाटत असावे, की आपण एक फोन केला की येतात सगळे धाऊन, सर्व कामधंदे सोडून, पगारी नोकर असल्या सारखे.

खरंच ओंकार, तू म्हणतोस ते अगदी योग्य आहे. की शासनाची मदत घेऊन एक कडक नियमावली तयार केलीच पाहिजे. तरंच अश्या बेजबाबदार आणि गल्लाभरू लोकांना आळा बसेल. अन्यथा खर्‍याखुर्‍या सह्याद्रि प्रेमींना ह्यांचा त्रासच सहन करावा लागेल.

ह्या सर्व प्रसंगावरून मला असे वाटते की, जसे चित्रपटासारखे, रंगमंचावर रिटेक नसतात, तुंम्ही केलेली चूक सुधरण्याची संधी नसते, तसेच प्रस्तारारोहणाच्या बाबतीतही म्हणावे लागेल.

पण सर्वच ग्रुप्स किंवा संस्था इतक्या बेजबाबदारपणे वागत असतील असे नाही, ह्यालाही काही अपवाद असतीलच, पण जे वागतात त्यांच्याबद्दल हा लेखन प्रपंच. हे वाचून ज्याने त्याने ठरवावे की ते कश्यात मोडतात. ह्या सर्व लेखन प्रपंच्याचा उद्देश एकच की बेजबाबदारपणा कळावा व कृतज्ञ भावना जागावी एव्हढीच कळकळ. आणि जे बेजबाबदारपणे वागले आहेत त्यांची कान-उघाडणी.

केवळ नवखेच यात फसतात असे नाही .काही वर्षाँपूर्वी एका नावाजलेल्या आणि जुन्या ट्रेकरने एका समुद्रकिनाऱ्याला चिटकून असणाऱ्या गुहेत मुलांना नेले होते .भरती ओहोटीचे गणित चुकले .भरतीचे पाणी गुहेत शिरू लागले आणि कठीण प्रसंग ओढवला .

वाघ सिंहांसारख्या हिंस्त्र जनावरांपेक्षाही हत्ती ,गेंडा ,अस्वल हे प्राणी जास्ती धोकादायक आहेत तसे सह्याद्रीतील अलंग मलंग हरिश्र्चंद्र नळीपेक्षा माहुली ,इर्शाळ ,सिध्दगड जास्ती धोकादायक ठरले आहेत .

पाणी आणि डोंगरांशी जेवढ्या जोराने टक्कर घेऊ तेवढ्या जोराने प्रतिकार होतो .मासोळी आणि उंदिर होऊन मजा घेता येते .

Srd,

हो मला आठवतेय ती गोष्ट. तेव्हा एका मुलीचा बुडून मृत्यू झाला होता. तिला पोहता येत नव्हतं. त्या समुद्राजवळच्या गुहांत जाण्यासाठी पोहणे येण्याची आवश्यकता नाही अशी जाहिरात केलेली होती.

मला वाटतं की हरीश कापडिया यांचं पुस्तक आहे तसं एखादं नवं पुस्तक लिहून वा यथोचित माहीती संकेतस्थळी संकलित करून ठेवावी. जेणेकरून अपेक्षित धोक्यांची जाणीव राहील.

आ.न.,
-गा.पै.

Pages