चल, फुंकरून टाकू सार्‍याच वादळांना

Submitted by जयदीप. on 22 January, 2014 - 12:38

आणू नकोस आता डोळ्यात आसवांना
चल, फुंकरून टाकू सार्‍याच वादळांना

मी ठेवले मनाशी त्यांना जपून होते
चोरी करून गेला विश्वास आज त्यांना

मानू नको कधी तू माझी विचारसरणी
ठेऊ नकोस नावे माझ्या मतांतरांना

नव्हतास तू तसेही करणार काम माझे
फोडू नकोस फाटे कुठल्याच कारणांना

'माझे' 'तुझे' कशाला? सारे तुझेच आहे...
घेऊन जा हवे तर माझ्या विरोधकांना

त्याच्या प्रगल्भतेची व्याख्या कुठेच नाही
भेटून घे हवे तर तू लाख पंडितांना

-जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा शेर सोडून सगळे तूफान आवडलेत
शेवटचाही छानच आहे पण पर्सनली मला कमी आवडला इतकेच

नव्या वर्षात गझल आधीपेक्षा छान येवू लागलीये ..अजून येवूद्यात
खूप खूप शुभेच्छा

मी ठेवले मनाशी त्यांना जपून होते
चोरी करून गेला विश्वास आज त्यांना<<<

हा एक शेर सोडून सर्व खयाल आवडले.

'माझे' 'तुझे' कशाला? सारे तुझेच आहे...
घेऊन जा हवे तर माझ्या विरोधकांना..............व्वाह... Happy