आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वादळे भटकून दमली माग माझा शोधताना
शान्त होतो झोपलेलो खोपटाच्या वळचणीला...

विद्ध झालो, क्लान्त झालो, दगदगीने कष्ट झाले,
सांगुनी असलेच काही रंग भरती मैफलीला..

गुळमटूनी तोंड नुसते तेच ते जगणे अताशा,
झणझणावी एक मिरची पालटाया या चवीला..

- स्वामीजी

कालचेच वेचतो अजून चांदणे!
आणतेस एवढे कुठून चांदणे?
का न व्हायची हरेक रात्र पौर्णिमा?
काळजात ठेवले जपून चांदणे!

.......प्रा.सतीश देवपूरकर
*******************************************

दुरावा, राग, चिडखोरी खुबीने टाळता येते!
न हस्तांदोलने केली तरीही हासता येते!!
प्रथम भेटीमधे व्यक्ती जराशी चाळता येते!
घरोबा जाहल्यावरती, चवीने वाचता येते!!

.............प्रोफेसर
*************************************************

ही तीच गे कोजागिरी....
तू आणि मी जागायचे!
ये बिलग पण, ऐसे बिलग....
आलिंगनी हरवायचे!

...........प्रोफेसर

हल्ली कुशीत माझ्या निजतात शब्द माझे

यावर लिहित होतो.

एक शेर सुचला.

शृन्गार दो घडीचा वेड्या मनास उमगे
पण मोगर्‍यास बघता चळतात शब्द माझे

दुसर्‍याच्या ओळी ढापुन लिहिले तर गल्ला मेहेरबान झाला तरी अल्ला मेहेरबान व्हायला स्वतःचीच प्रतिभा लागते.
-- गुरुवर्य बेफिकिर 'अल्ला मेहेरबान ' या आयडीला बोलले होते.

Happy

सगळे कसे अताशा, छान चालले होते
जखमांना काळाचे, मलम लावले होते
-अशोक

आहे जागा जखमांना, हृदयावर अजून थोडी
ये परजून शस्त्रे सारी, माझ्यावर अजून थोडी
-अशोक

एक काहीसा नवा शेरः

अपुली गती रहावी अपुलीच पाह इतके
दुनियेस सोडुनी दे, दुनिया खिशात थोडी

समीर चव्हाण

नवे शेर

घाईत ह्या पोचायच्या पाऊस आला नेमका
येथेच आहे घर चला छत्री नको उघडायला

करपाडीला(*) दारीद्र्याचा बक्कळ पाउस पडतो बहुधा
छोटी छोटी किती खोपटी उगवतात दररोज नव्याने

करपाडी - डोंगराचा उतरत जाणारा भाग(गावाकडच्या बोली भाषेतील शब्द)

-विजय दिनकर पाटील

करपाडीला दारीद्र्याचा बक्कळ पाउस पडतो बहुधा
छोटी छोटी किती खोपटी उगवतात दररोज नव्याने

व्वा.

दारिद्र्याचा असा शब्द असावा.
छत्रीचा शेरही उत्तम.

अरविंदजी:

शिकवावा लागत नाही,असावा लागतो तो
प्रामाणिकपणात नसते कुठली टक्केवारी

अगदी खरे.
पहिला शेर वाचताना लयीत अडखळायला झाले.

पुन्हा एकदा धागा वाचत आहे.

पाट्या टाकत ये जा करतो कायम एकच रस्त्याने
पूर्वी पायी आता गाडी हेच काय ते न्यारेपण

विजय, जबरदस्त शेर आहे.

माश्याही फिरकून पहाण्याश्या झाल्या आहे<<<<< ????????
ओरीजनॅलिटीच्या नावाखाली मराठी भाषेची बोंब होत आहे काय हे तपासावे प्लीज !!!!!!!

कसाबसा मी दिवस कटवतो माश्यांना मारत
माश्याही फिरकून पाहिनाश्या झाल्यात अता

.......असे करता येते . बघा पटले तर !

Pages