'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

लोकहो, सर्वांना एकत्रित प्रतिसाद देतोय.

१. स्वाती आंबोळे,

१.१
>> परस्परसंमतीने निर्माण झालेलं नातं याचा अर्थ तुम्हाला खरंच समजत नाहीये का?

काश प्रॉब्लेम इतनाही होता. परस्पर संमतीने नातं होऊ द्यायला काहीच अडचण नाही. पण पौगंडावस्थेतल्या मुलास तो गे आहे असं भासवून फसवलं जाण्याची शक्यता बरीच जास्त असते.

पुगंड म्हणजे पुरुषत्वाचा गंड. म्हणजे 'मी पुरुष आहे की नाही' ही शंका. या पुगंड शब्दावरून पौगंड हे विशेषण तयार झालेलं आहे.

१.२
>> आनंदीवनात असं काय चालतं की जे भिन्नलैंगिकांच्या जगात होत नाही? ड्रग्ज? प्रॉस्टीट्यूशन?
>> स्टॉकिंग? रेप्स?

आनंदीवनात ड्रग्ज युसेज बाह्य जगाच्या ७ पटीने होतो. छोट्याश्या २% समूहात जर ड्रग्जचा वापर उर्वरित ९८% च्या तुलनेने ७ पट अधिक असेल तर २% समूह प्रचंड भयावह समस्यांनी घेरलेला आहे.

असो.

२. स्वाती२,

>> पुनर्विचार हवाय तो अशा केसेस साठी.

मान्य! रेल्वेच्या तिकीटापल्याड प्रवास केला तर भारतात गुन्हा धरला जातो. भाड्याच्या फरकासोबत दंडही भरावा लागतो. मात्र इथे इंग्लंडमध्ये तो गुन्हा नाही. तुम्ही म्हणता तो continuation of natural course beyond its limit imposed by change in circumstances असा प्रकार आहे.

मात्र जर कोणी मुलीचं संमतीवय खाली आणायचा (१८ वरून १६) प्रयत्न करीत असेल तर तो संशयास्पद हेतू ठरणार नाही का?

असो.

३. वैद्यबुवा,

३.१
>> हे गामा साहेब जरी पुष्कळ रिसर्च ओरियेंटेड वाटले तरी त्यांच्या रिसर्च करुन मत मांडायच्या इच्छेच्या
>> बुडाखाली असलेच बाळबोध समज/कल्पना आहेत.
>> He doesn't have an open mind and is most certainly not looking for a new perspective.

माझं मन किती खुलं वा बंदिस्त असलं किंवा माझ्या कल्पना कितीही बाळबोध असल्याचं मान्य केलं तरी त्यामुळे गे समूहाचे प्रश्न सुटणार आहेत का? त्या समस्या आपण कशा हाताळणार आहोत?

३.२
>> थोडक्यात पुरुष गे असला की लगेच तो आतून स्त्री होतो का?

होत नाही. पण कोणी असा दावा केला तर? कृपया इथे पहा.

३.३
>> ह्या एकट्या बिनडोक माणसाला समजवून असा काय बदल होणार आहे समाजात?

परत समाजाला कशाला ओढताय? गे लोकांच्या समस्या उर्वरित समाजामुळे उत्पन्न झाल्या आहेत ही बिनडोक विचारसरणी आहे.

असो.

४. चिनूक्स,

>> उगाच बालरतीत्व वगैरे मध्ये आणू नका. या मुद्द्याशी काहीच संबंध नाहीये पीडोफिलियाचा.

तथ्य क्र. १
पीडोगिरी आणू पाहणारे काय खुलेआम आणणार आहेत का? ती 'बालकांचे लैंगिक अधिकार' अशा नावाखाली आणली जाणार आहे. एकदा समरतीत्व हे एक नैसर्गिक निर्देशन (natural orientation) म्हणून स्वीकारलं गेलं की यौवनपूर्व निर्देशन (pre puberty orientation) आपसूक नैसर्गिक होतं. यातून पुढे 'बालकांचे लैंगिक अधिकार' प्रस्थापित होतील. कर्तव्याची जाणीव नसतांना अधिकार देणं कितपत योग्य? कुण्या 'बालका'ने 'प्रौढ सोबती'ची मागणी केली तर ती पुरी करायची का? शिवाय वयात येणार्‍या मुलाच्या वा मुलीच्या मनात असा संभ्रम टाकणं कितपत योग्य?

तथ्य क्र. २
आता इथे बघा काय म्हंटलंय :

>> The percentage of male homosexuals among convicted child molesters is many times
>> higher than the percentage of male homosexuals in the general population.

ही दोन तथ्ये एकत्र वाचली तर काय अर्थ ध्वनित होतो? तुम्हीच सांगा!

असो.

५. असामी,

>> गामा तुमचे मुद्दे म्हणजे नुसते fear mongering चा आदर्श नमुना आहेत

मी सांगितलेल्या गोष्टी पाश्चात्य समाजात प्रत्यक्ष घडत आहेत. संमतीवय घटवण्याची चळवळ नेदरलंड्समध्ये चालू आहे. मध्यंतरी व्य घटवण्याविरुद्ध इंग्लंडमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. इंग्लंडमधले लोक भयकारणी (fear mongering) म्हणायला पाहिजेत.

आजून एक बातमी : http://www.lifesitenews.com/news/archive//ldn/2010/sep/10090110

असो.

बरंच लिहिलं आहे. आता थोडं थांबतो.

आ.न.,
-गा.पै.

>>पण पौगंडावस्थेतल्या मुलास तो गे आहे असं भासवून फसवलं जाण्याची शक्यता बरीच जास्त असते.

अमेरिकेतील फक्त फॉक्स न्यूज पहाणारे काही लोक अशाच भितीखाली वावरत असतात. एखाद्या गे मुलास तू स्ट्रेट आहेस असे भासवून फसवले जाणे अशक्य अहे तसेच हेही अशक्य आहे. Fear Mongering.

"I was bullied on a daily basis; it got quite bad, in terms of physical assaults. I didn't feel comfortable being myself and at 14, when I wasn't even out, I started smoking cannabis at the end of the playing fields to numb myself to the reality of day-to-day existence. This led me to taking more serious drugs, like speed and acid, then cocaine"

वरील इंग्रजी परिच्छेद तुम्हीच दिलेल्या दुव्यात आहे. त्यावरून ड्रग्स चा वापर जास्त असण्याचे एक कारण समजेल. मुळात ड्रग्स चा इतका बाऊ करायची गरज नाही. अमेरिकेत तर ड्रग्स सर्रास मिळतात, त्यामुळे ड्रग वपरतात हे काहीतरी अति भयंकर आहे असे बाळबोध विचार करू नयेत. शिवाय ही आकडेवारी फसवी आहे (sampling bias) त्याबदल नंतर कधीतरी.

आणी समजा गे लोक जास्त ड्रग वापरतात हे सिद्ध झाले, तर काय गे लोकांना गॅस चेम्बर मध्ये कोंडून ठार करणार ?

तुम्ही दिलेली इतर दोन दुवे तर चक्क Bibile Thumper चे आहेत. बायबल वाक्यं प्रमाणं अशी श्रद्धा ठेवणारे आणी गे बद्दल स्वतःचा अजेंडा बळगणारे हे लोक. यांचे लेखन चमचाभर मीठाबरोबरच घ्यायला हवं. गे लोकांना इतर हक्क मिळाले तरी फौजदारी गुन्ह्यात त्यांना समान वागणूकच मिळेल. गे लोकांना ड्रग घ्यायला परवानगी द्या, त्यांना लहान मुलांवर अत्याचार करायला परवानगी द्या ई मागण्या नाहीत. त्यांना माणसाप्रमाणे जगू द्या इतकंच.

पुरोगामी महाराष्ट्रात एक दिवस हे सारे होईल. आणी श्री आणी सौरभ यांच्या प्रेमावर आधारित 'होणार जावई मी या घरचा' ही मालिका पहायला मिळेल ही त्या जगंनियंत्याचरणी प्रार्थना. हेमाशेपो.

मी सगळे प्रतिसाद वाचले नाहीत, पण बेफिकीर यान्च्या गजबज वरुन घरन्गळत इकडे आल्यावर इथे गामापैलवान यान्च्या पोस्टी पटल्या हे सान्गण्यापुरता इथे लिहितोय.

थोडंफार किबोर्ड बडवायला जमलं की उगीच वाटेल त्या लिंक्स द्यायच्या, बाष्कळ बडबडत रहायचे, कळून न कळल्यासारखे करायचे, समर्थनाला दोन-चार पाठीराखे आणायचे याला चर्चा म्हणतात का?
पैलवान तु नावाप्रमाणेच पैलवान आहेस. वरचा मजला रिकामा असलेला.

मुर्खाशी वाद घालण्यात काय हशील? अनुल्लेखाने मारा लोकहो.

गामापै, अट्टल दारुबाज/बेवड्याला देखिल "मानसिक रुग्ण" ठरविण्याची निदान भारतातली तरी स्थिती आहे, व त्याप्रमाणे अवचटांच्या येरवड्यातील मुक्तांगण संस्थेमधे मानसिक आजारी म्हणून उपचारही केले जातात.
त्यातुलनेत, समलैन्गिकता हा तर कितीतरी गंभिर मानसिक आजार मानला पाहिजे.
पण तसे न होता इथे जिथे तिथे तर अशा समलिन्गी(?) मानसिक रुग्णान्ना विशेष दर्जा/अधिकार / कायद्याचे संरक्षण वगिअरे हवे असे मांडले जाते आहे ते अचाट आहे. हेच सूत्र / गणीत लावायचे तर मग दारुड्यान्ना/बेवड्यान्ना देखिल विशेष कायदा या देशात करावा काय? Proud होईलही, लौकरच तशी मागणीही होईल, फक्त थोडी कळ काढा.
पुरोगामी महाराष्ट्र अन "जगन्नियन्ता" हे परस्परविरोधी शबद एकत्र नान्दू शकताहेत वर, तर यान्च्या पुरोगामी(?) महाराष्ट्रात कमरेचे पूर्ण सोडून डोक्याला गुन्डाळले गेले तरी नवल वाटायला नको.

आमचे झाले गेले, निम्मी लाकडे गोवर्‍या स्माशानात पोचल्यात, पण आमच्या पुढच्या पिढीचे खरच अवघड आहे बोवा.

विषयाची अजिबात माहिती नसताना/करून न घेता त्यावर बोलणे हाही एक मानसिक आजार आहे. पण त्यावर उपाय नाही.
लिंटिं, बाकी काही वाचले नाहीत तरी हेडरमधल्या लेखातले किमान पहिले दोन परिच्छेद वाचण्याचे कष्ट घेतलेत तर कळेल की विशेष दर्जा, अधिकार, कायद्याचे संरक्षण इ. काहीही मागितले जात नाही आहे.
तुम्ही ज्याला मानसिक आजार समजताय त्यावर सध्या कायद्याला तुरुंगवास हा उपचार वाटतोय.

कलम ३७७अंतर्गत, (फक्त समलिंगीच नव्हे तर इतरही) किती माणसांना ह्या कायद्याखाली गुन्हेगार म्हणून तुरुंगवास पत्करावा लागला आहे / अटक झाली आहे? एकाला तरी झाली आहे का? कोणाला ह्याची माहिती आहे का? अशी अटक झाली असेल(च) तर...

असा तुरुंगवास घडवण्यासाठी दोन (अथवा अधिक) सज्ञान माणसांमधे (स्त्री-पुरुष अथवा फक्त स्त्रिया अथवा फक्त पुरुष) परस्पर संमतीने झालेले सध्याच्या कायद्यानुसार "अनैसर्गिक' " गणले जाणारे लैंगिक संबंध' (ह्या मधे समलिंगी संबंधही आले) कोणीही सिध्द कसे करू शकेल / करतील / करतात.

("कामातुराणाम् न भयं न लज्जा" मधे वाहवत जाऊन उघड्यावर असे संबंध स्थापित करणार्‍या व्यक्तिंचे प्रमाण नगण्य अथवा शून्य आहे असे मानून उत्तर द्यावे)

>>>>>> विषयाची अजिबात माहिती नसताना/करून न घेता त्यावर बोलणे हाही एक मानसिक आजार आहे. पण त्यावर उपाय नाही. <<<<<< भरतराव, हे वाक्य तुम्हालाच साभार अन स्सव्व्याज परत करतो.

>>>>>> लिंटिं, बाकी काही वाचले नाहीत तरी हेडरमधल्या लेखातले किमान पहिले दोन परिच्छेद वाचण्याचे कष्ट घेतलेत तर कळेल की विशेष दर्जा, अधिकार, कायद्याचे संरक्षण इ. काहीही मागितले जात नाही आहे. <<<<<<
ओके, मग तुम्ही याच लेखातील या पुढील अपेक्षा वाचण्याच्या अन समजुन घेण्याचे कष्ट घेणार का? Wink

>>>>> पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. <<<<<<
काहीच मागितले जात नाहीये असे तुम्ही म्हणता म्हणून विश्वास ठेवू भरतजी, की वरील पान्ढर्‍यावरील काळी अक्षरे तुम्हाला कसल्याच मागण्या वाटत नाहीत असे म्हणू की तीच तेवढी अक्षरे तुमच्याकरता "काळा अक्षर म्हैंस बराबर" आहेत असे समजू? Proud

मानसिक आजारावर उपचार न करता अशा जोडप्यान्ना मुल दत्तक घेऊ द्यायची? कुणाची?
अर्थात झक्की म्हणतात त्याप्रमाणे भारतात काय, काहीही घडू शकते.
[ मी इथे, जन्मजात लिन्ग निश्चित स्वरुपाचे नसणे / तृतियपंथी असणे,या विरुद्ध बाकि सर्व शरिर/लिन्ग वगैरे ठीक असूनही केवळ मानसिक(?) आकर्षण/दौर्बल्यापोटी समलिन्गित्व मानणे यात फरक करतोय, हा फरक चूक असेल तर तसे जाणकारान्नी सान्गावे. ]
याव्यतिरिक्त कृत्रिमरित्या तृतियपन्थी बनविण्याचे कार्य केले जाते तो विषयच वेगळा आहे. पण माझा त्यावर अभ्यास्/वाचन फारसे नाही.

हर्पेन,

<कलम ३७७अंतर्गत, (फक्त समलिंगीच नव्हे तर इतरही) किती माणसांना ह्या कायद्याखाली गुन्हेगार म्हणून तुरुंगवास पत्करावा लागला आहे / अटक झाली आहे? एकाला तरी झाली आहे का? कोणाला ह्याची माहिती आहे का? अशी अटक झाली असेल(च) तर..>

समजा शिक्षा झाली नसेल, तरी असे संबंध ठेवणारे गुन्हेगार ठरतात.
शिक्षा होत नाही, मग मागण्या कशाला, असं तुला म्हणायचं आहे का?

लिंबूटिंबू,
हा मानसिक आजार नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तसं मान्य केलं आहे. शिवाय ज्या ज्या देशांमध्ये समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता आहे, त्या सर्व देशांनी तसं जाहीर केलं आहे. भारत सरकारनेही सुप्रीम कोर्टात तसं सांगितलं आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तसं मान्य केलं आहे. <<
विचारतंय कोण त्यांना. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनवाले कम्युनिस्ट असतील त्यामुळे मान्य केलं असेल. आमच्या संस्कृतीत मी म्हणतो तेच खरे कळ्ळं?

नाही चिनूक्स पण आपल्याकडे पकडला जाईल तो (आणि पकडला गेला आणि गुन्हा सिध्द झाला तर आणि तरच) तो गुन्हेगार ठरतो, आपण सर्वच जण नियम कायदे सर्रास तोडतो, पकडले गेलो नाही तर आपण सगळेच आपल्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवले जाऊ असे व्यवहार व्यवस्थितपणे चालू ठेवतो.

आणि माझा प्रश्न, खरोखरच माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने विचारला आहे; कृपया बगल देऊ नकोस...:)

>>>>> वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तसं मान्य केलं आहे. शिवाय ज्या ज्या देशांमध्ये समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता आहे, त्या सर्व देशांनी तसं जाहीर केलं आहे. भारत सरकारनेही सुप्रीम कोर्टात तसं सांगितलं आहे. <<<<<

अशी मोठमोठी नावे/संस्था/देशांचे दाखले देत काही केले की "मानसिक आजाराचा" मुद्दा निकाली कसा निघू शकतो? असे दाखले देणे जर योग्य ठरत असेल, तर आम्हि कधीकाळी आमच्या धर्मातील पुराणातील दाखले दिले तर मात्र कसे वसा वसा सगळेजण धावुन येतात, नै? तर मुद्दा हा की त्या अन्य देशान्ची, इतकेच नव्हे तर "भारत सरकारची" वान्गी त्यान्च्या कोर्टातील युक्तिवादातच राहुद्यात, इथे माबोवर लिहीताना स्वतंत्र युक्तिवाद / विचार मान्डायला काय हरकत आहे?
लेट अस डिफाइन की समलैन्गिकता म्हणजे नेमके काय आहे. या इथेच शब्दात वर्णन करुन सान्गा/शिकवा आम्हाला. मग आपण ठरवू शकू की हा मानसिक आजार आहे , शारिरिक वैगुण्य आहे की नको तिथे उतू जाणारा माज आहे.
मी पुन्हा सान्गतो, की इथे या प्रश्नात शारिरिक अक्षमता गृहित धरलेली नाही. लिन्गच नसणे/ असल्यास तोकडे/विचित्र असणे / वा दुहेरी शरिर असणे जसे की अर्धवटरित्या पुरुषाचे लिन्ग पण बाकी अवयव स्त्रीत्वाकडे झुकणारे वगैरे, असे तृतिय पंथींचे प्रकार इथे अपेक्षित नसावेत.
अन समलैन्गिकतेमधे शारिरिक अक्षमता हे कारण नसेल, तर उरते ते केवळ मानसिक दौर्बल्य हे माझे मत ठाम आहे.
असो. तुमचे चालूद्यात.
याक्षणी इतके नक्की सान्गू शकेन की पुराणात दाखला दिल्याप्रमाणे प्रत्यक व्यक्ती "अर्धनारीनटेश्वर" असतेच असते, फक्त नर म्हणुन की नारी म्हणून जगणार हे शरिराची रचना भावभावना ठरवितात. जिथे याबद्दल गोन्धळ असतो ते तृतियपंथी ठरले जातात.
पण यापेक्षा वेगळे जाऊन स्त्रीने केवळ स्त्रीबरोबर, वा पुरुषाने केवळ पुरुषाबरोबर लैन्गिक संबंध (?????? कशाप्रकारे ठेवतात काय की) ठेवले, तर ते केवळ अनैसर्गिकच नसून मानसिक/बौद्धिक दोषाचे लक्षण मानावे लागेल. समोर सुंदर स्त्री ऐवजी एखादा पुरुष जर कोवळ्या दिसणार्‍या पुरुषाबरोबरच लैन्गिक(?) संबंध ठेवू इच्छित असेल, तर त्यास मानसिक विकृती म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?

चिनुक्स, २००५ पासून "विकृत" हा शब्द नको तिथे, नको त्या संदर्भाने, नको त्याव्यक्तिबद्दल, विनाकारण दूष्ट व द्वेषबुद्धिने अतिवापर करुन गुळगुळीत झाल्यामुळेच बहुधा २०१४ मधे विकृत या शब्दाचा अर्थ व अर्थछाटाच तुमच्या विस्मरणांत गेल्या असाव्यात असे वाटू लागले आहे. अन त्यामुळेच, समलैन्गिकता, ही विकृत असू शकते हेच मान्य नसल्याने कायदे वगैरे असावेत असे "कुणाला" वाटत असल्यास त्यात नवल नाही.

हर्पेन,
मी बगल का देऊ? तुला काय म्हणायचं आहे, ते समजून घेण्यासाठी तुला एक प्रश्न विचारला. कृपया पटकन निष्कर्ष काढू नकोस. असो.

मुळात तुझा प्रश्नच मला अतिशय चुकीचा वाटतो. भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. भारतीय सैन्यात समलिंगी व्यक्तींना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

आता कोणी पकडला गेला, नाही गेला, याला काही अर्थ नाही. लैंगिक व्यवहार हे रोजच्या जगण्याशी निगडित आहेत. हे जगणं खाजगी आहे. हे खाजगी जगणं कसं असावं, हे कायद्याने ठरवू नये. आपण इतर कायदे सर्रास मोडतो, शिक्षा कुठे होते, असं विचारून काय हशील? कायदे मोडणं म्हणजे कर्तृत्व दाखवणं नव्हे आणि अभिमानाने सांगण्याची गोष्टतर मुळीच नव्हे. आणि म्हणूनच व्यक्तिस्वांत्र्यावर गदा आणणारे असे कायदे अस्तित्वात असू नयेत.

एखादा कायदा मोडायचा असेल, तर सविनय कायदेभंग वगैरे करतात, पण त्यासाठी तो कायदा मोडणार्‍याची तुरुंगात जायचीही तयारी असते. इथे दोन सज्ञान व्यक्तींनी स्वखुशीने शयनगृहात काय करावे, हे कायद्याने का ठरवावे? दुसरं म्हणजे या खाजगी जगण्यासाठी भारतात रशियात होतात तशा खूप मोठ्या संख्येनं शिक्षा होत नसतीलही. पण कुठल्यातरी मध्ययुगीन कायद्यामुळे एका व्यक्तीलातरी शिक्षा का व्हावी? व्यक्तिस्वातंत्र्याचं उल्लंघन होऊन कोट्यवधी लोकसंख्येपैकी एका व्यक्तीला जरी शिक्षा झाली, तरी ते चूक आहे.

समलैंगिकता हा कायद्यानं गुन्हा असल्यानं समाजात त्याबद्दल अनेक अपसमज आहेत. मुलंमुली आपल्या आईवडिलांशी मोकळेपणी बोलू शकत नाहीत. पोलिसांची प्रचंड भीती असते. अनेकांना पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो.

अजून काही प्रश्न असतील तर जरूर विचार. प्रश्नांना बगल द्यायची गरज मला वाटत नाही. Happy

बाकी, एक मजा वाटली. आज इथे समलैंगिकांना शिव्या घालणारे, विकृत ठरवणारे या संकेतस्थळावर ज्या व्यक्तीमुळे लिहू शकत आहेत, तो अ‍ॅलन ट्युरिंग हा शास्त्रज्ञ समलिंगी होता. त्याला इंग्लंडमध्ये तो समलिंगी असल्यानं शिक्षा झाली होती. नुकतीच ब्रिटननं त्याची माफी मागितली आणि त्याला माफ केलं.

लिंबू,
हरकत नाही. तुला वैज्ञानिक संशोधन मान्य नाही. मग तू समलैंगिकांना मनोरुग्ण कशाच्या आधारावर ठरवत आहेस, ते कृपया सांग.
ऋग्वेदात विकृतिः एवम्‌ प्रकृतिः। असं म्हटलं आहे, ते तुला माहीत आहे का? याबद्दल श्री श्री श्री रविशंकर काय म्हणतात ते तू वाचलंस का?

हिरव्याकंच मऊमऊ गवताच्या गालिच्यावरुन अनवाणी चालताना मधेच पायात गुलाबाचा किन्वा बाभळीचा काटा रुतावा तसे काही काही पोस्टी वाचल्यावर वाटते आहे.
विशिष्ट आयडीच्या पोस्टी दिसल्या की त्याच त्या घिशापिट्या संस्कृतीरक्षक/पुराणे/धर्म/ त्या आयडीची अक्कल-बक्कल वगैरे काढून समोरचा चिरडीस यावा याप्रमाणे आडून पण वैयक्तिकच रोखाने केल्या जाणार्‍या दुर्गन्धीयुक्त फुसकुली समान कॉमेण्ट्स या मला तरी झाडाखाली उभ्याकेलेल्या लाखोन्च्या कारवर कावळ्याने शिटून घाण केल्याप्रमाणे वाटतात/भासतात. Proud
असो. मी देखिल इग्नोर मारायला शिकतोय.

किमान चिनुक्सच्या धाग्यावर मला हे अपेक्षित नव्हते/नाही. Happy

>>>>> ऋग्वेदात विकृतिः एवम्‌ प्रकृतिः। असं म्हटलं आहे, ते तुला माहीत आहे का? <<<<
माझ्या आधीच्या पोस्टमधे मी व हर्पेनने जे विचारले आहे ते सान्ग. धागा तुझा आहे.
ते सान्गता येत नसेल, तरच दुसरे प्रश्न विचारुन बगल देऊ बघ.

वर हर्पेनच्या पोस्टीला उत्तर दिले आहे. त्यावर त्याचे काही प्रश्न असतील, तर तो विचारेलच.

तुझ्या पोस्टीतले निष्कर्ष हे केवळ तुझे आहेत. तुला वैज्ञानिक निष्कर्ष मान्य नाहीत. तुला पुराणातील संदर्भ हवे असतील, तर तेही देऊ शकतो. भागवतपुराणात शिव आणि विष्णू एकरूप कसे, ते आलं आहे. स्कंदपुराणात सुमेध आणि सोमवान आहेत.कथासरित्सागरात कलिंगसेन आहे. अय्यप्पा कोण होता? बौद्ध वाङ्मयात मित्राबरोबर जंगलात राहणारा सुदन्त आहे. ठरलेलं लग्न होऊ नये म्हणून स्वतःचे केस कापून टाकणारी, मैत्रिणीबरोबर पळून जाणारी सुमेधा आहे. सलग दोन जन्म एकमेकांचे मित्र म्हणून जन्माला येणारे सारिपुत्त आणि मोग्गल्लण आहेत.

राजतरंगिणीत आपल्या सेवकांबरोबर गुदसंभोग करणारा राजा आहे. 'शीलपडिक्कम्' या काव्यात राजाला नजराणा म्हणून मिळणार्‍या कंजुक म्हणजे पुरुष वेश्यांचा उल्लेख आहे. वात्स्यायन, माधवाचार्य यांनी केलेली समलिंगी संभोगाची वर्णनं तर वेगळीच. एकुणात प्राचीन वाङ्मयात जी जेंडर फ्लुइडिटी आढळते, ती अवाक करणारी आहे.

त्यामुळे केवळ 'मला असं वाटतं..' याला काही अर्थ नसतो.

>>मात्र जर कोणी मुलीचं संमतीवय खाली आणायचा (१८ वरून १६) प्रयत्न करीत असेल तर तो संशयास्पद हेतू ठरणार नाही का?>>
गा. पै. ,
पहिली गोष्ट म्हणजे कंसेटच्या वयाचा कायदा मुलगा आणि मुलगी दोघांसाठी आहे. आणि वय खाली आणण्याची मागणीही नाहीये. शिक्षा नको असेही म्हणणे नाहीये. फक्त सरसकट सेक्स ऑफेंडर म्हणून रजिस्टर करुन आयुष्यभर ठप्पा लावू नये. केस बाय केस विचार व्हावा एवढीच अपेक्षा आहे. आमच्या इथे दुसर्‍या केस मधे १७ वर्षांचा मुलगा आणि स्त्री कोच अशी परीस्थिती होती. रिलेशनशिप नोकरी सुरु केल्यावर झाली. अशा वेळी पदाचा वापर करुन मुलाला फुस लावली म्हणायला वाव आहे. अशावेळी झालेली शिक्षा , सेक्स ऑफेंडर म्हणून नोंद योग्य वाटते. पण आधीपासून अस्तित्वात असलेले राजीखुशीने, कायद्याने संमती दिलेले नाते निव्वळ नोकरी बदलली म्हणून सेक्स ऑफेंडर चा गुन्हा ठरु नये.
समरतित्व हे नैसर्गिक आहे हे स्विकारण्याने मुळातल्या कंसेटच्या कायद्यात काहीच बदल घडणार नाहीये. आज हेटरो असणे नैसर्गिक आहे तरीही त्यांच्यासाठी कंसेंटचा कायदा आहेच ना? मुलांना सेक्शुअल प्रिडेटर्स पासून संरक्षण कायद्याने दिलेले आहेच. यात मुलाला 'नकारा' चा अधिकार आहे मात्र 'हो' म्हणायचा अधिकार नाही. म्हणूनच मुलाने संमती होती म्हटले तरी स्टॅट्युटरी रेप धरला जातो.

< लिंटिं, बाकी काही वाचले नाहीत तरी हेडरमधल्या लेखातले किमान पहिले दोन परिच्छेद वाचण्याचे कष्ट घेतलेत तर कळेल की विशेष दर्जा, अधिकार, कायद्याचे संरक्षण इ. काहीही मागितले जात नाही आहे. <<<<<<

>>>>> पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. <<<<<<
काहीच मागितले जात नाहीये असे तुम्ही म्हणता म्हणून विश्वास ठेवू भरतजी, की वरील पान्ढर्‍यावरील काळी अक्षरे तुम्हाला कसल्याच मागण्या वाटत नाहीत असे म्हणू की तीच तेवढी अक्षरे तुमच्याकरता "काळा अक्षर म्हैंस बराबर" आहेत असे समजू>

पुन्हा वाचा. ज्या अपेक्षा लिहिल्या आहेत त्या बाकीच्या नागरिकांना मिळतात त्याच आहेत.. समलैंगिकांना नाकारल्या जातात. तेवढ्याच मिळाव्यात अशी पुढची मागणी असेल.

यात कोणतेही विशेष हक्क, अधिकार , संरक्षण नाही.

<नाही चिनूक्स पण आपल्याकडे पकडला जाईल तो (आणि पकडला गेला आणि गुन्हा सिध्द झाला तर आणि तरच) तो गुन्हेगार ठरतो, आपण सर्वच जण नियम कायदे सर्रास तोडतो, पकडले गेलो नाही तर आपण सगळेच आपल्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवले जाऊ असे व्यवहार व्यवस्थितपणे चालू ठेवतो.>

ज्या कृत्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसलेला आहे असे कृत्य आम्ही करतो असे कोण कबूल करतो?

कलम ३७७ खाली अटक होत नसेल, खटले चालवले नसतील पण पोलिस आणि समाजकंटक या कलमाचा धाक दाखवून समलैंगिकांची शारीरिक, आर्थिक, मानसिक छळवणूक करतात. नाडतात.

कौटुंबिक, सामाजिक समस्यांबद्दल बोलायचे तर तो वेगळ्या लेखांचा विषय होईल.

परत समाजाला कशाला ओढताय? गे लोकांच्या समस्या उर्वरित समाजामुळे उत्पन्न झाल्या आहेत ही बिनडोक विचारसरणी आहे.>>>>>>>> उर्वरित समाजामुळे नाहीतर कशामुळे? उर्वरित समाज गे लोकांना त्यांच्या सेक्शुअल ओरियेंटेशन मुळे त्यांना "वेगळे" समजून त्यांना समान हक्क द्यायचे नाही म्हणतात ही समस्याच नाही का?
तुमचं डोकं अनबायस्ड ठेवलं तर हे लक्षात येइल की गे लोकांना स्पेशल ट्रिटमेंट द्या असं कोणी म्हणत नाहीये. चिनूक्स,मयेकर, विकु ह्यांनी त्याबद्दल वर लिहिलेच आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात एक दिवस हे सारे होईल. आणी श्री आणी सौरभ यांच्या प्रेमावर आधारित 'होणार जावई मी या घरचा' ही मालिका पहायला मिळेल ही त्या जगंनियंत्याचरणी प्रार्थना. हेमाशेपो.>>>> Lol हेमाशेपो कायको विकु?

गामा तुम्ही माझ्या fear mongering च्या आरोपाला उत्तर देताना दिलेले दुवे नीट वाचलेत नि त्या मागण्या करणा र्‍या लोकांबद्दल थोडेसे अधिक वाचलेत तर तुमच्या लक्षात येईल कि ते अपवादात्मक आहेत. पण तुम्ही ज्या तर्‍हेने ते पुढे आणता नि ते घेऊन फक्त त्यावर आधारीत जे generalization करता आहात हे fear mongering चेच आदर्श उदाहरण आहे. Happy

vijaykulkarni,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> एखाद्या गे मुलास तू स्ट्रेट आहेस असे भासवून फसवले जाणे अशक्य अहे तसेच हेही अशक्य आहे.
>> Fear Mongering.

एव्हढं सरळधोप थोडंच असतं! लोकं उभयरती (bi-sexual) कसे होतात? कुठलीतरी एक ओढ नैसर्गिक मानली तर दुसरी अनैसर्गिक होणार ना? का दोन्ही नैसर्गिक मानायच्या?

२.
>> आणी समजा गे लोक जास्त ड्रग वापरतात हे सिद्ध झाले, तर काय गे लोकांना गॅस चेम्बर मध्ये
>> कोंडून ठार करणार ?

गुड क्वेश्चन! रोगाचा तिरस्कार करावा. रोग्याचा नव्हे. गे पणा म्हणजे एक विकार आहे हे एकदा स्वीकारलं की उपाय करता येतील. पण गे पणा नैसर्गिकच आहे असं मत कवटाळून बसलात तर सोबतच्या समस्यांचं काय? या समस्यांवर काही उपाय करायला हवा का?

आ.न.,
-गा.पै.

बरं परत एक प्रश्न इथल्या समलैगिंकतेच्या वकीलांना...
स्त्री पुरुषांना अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटतात (पॉलीगामी), हे अत्यंत नैसर्गीक आहे .या न्यायाने उद्या काही लोकांनी वाईफ/ हजबंड स्वॅपींगचे उघड समर्थन करायला सुरवात केली तर आपला पाठींबा असेल काय?
जरा इमॅजीन करा..

तुमच्या जोडीदाराने, पती अथवा पत्नीने अशी स्वॅपिंगची इच्छा व्यक्ती केली तर आपल्याला काय वाटेल?सहज वाटेल कि धक्का बसेल?... कि नैसर्गीक आहे चला करु या असे म्हणाल...
एखादी घटना /विचार फक्त नॅचरल अननॅचरल या डायकोटोमीत बसवता येत नाही, नैतिक आर्थिक भावनिक धार्मिक सांस्कृतीक अश्या अनेक मिती त्याला असतात, तदनुसार विचार करावा लागतो...

पॉलीगामी आणि स्वॅपींग वेगळे विषय आहेत. पॉलीगामी असणार्या अनेक संस्कृती आहेत. तिथे मुख्य आक्षेप (निदान माझा तरी) एका स्त्रीला अनेक पती करायची परवानगी नसते म्हणून ती पद्धत स्त्रियांसाठी अन्याय्य आहे. पॉलीगामी आणि पॉलीअंड्री दोन्ही असेल तर तेही ठीकच आहे. बाकी स्वॅपींग, इंसेस्ट ह्या विषयांची मागणी झाली तर ती मान्य करण्यात "अनैतिक" काही नाही. मात्र होणार्या अपत्यांची, शारीरिक आजारांची जबाबदारी कोण आणि कशी घेणार हा विषय आधी चर्चा केला पाहिजे. समाजावर अवांछित अपत्ये आणि आजार यांचा भर टाकणे योग्य नाही. त्यासाठी कायदे झाले पाहिजेत. दारू, ड्रग्ज, स्वॅपींग, इंसेस्ट हे विषय मी आचरणात आणू शकत नाही पण म्हणून कुणी दुसरे करीत असतील तर मी "हॅव फन" म्हणून मोकळी होईन.

जर दोन्ही जोडप्यांची संमती असेल, तर वाईफ स्वॉपिंग हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा नाही. >>> वाईफ स्वॉपिंग चा भारतीय कायद्यात उल्लेख आहे??? बापरे, हे नवीन कळल!! भारतीय कायद्यात वाईफ स्वॉपिंग चालत नाही. जर स्त्रीच्या समती विरुद्ध असेल तर तो रेप ठरतो आणि जर स्त्री ची समती असेल तर ती सुटते पण पुरुषाविरुद्द 'अडलट्री'चा गुन्हा दाखल होईल. तिथे पतीची समती होती नव्हती हा मुद्दा गौण आहे. "मुक्त विवाह"/ ओपन मारेज भारतीय कायद्यास मान्य नाही.
समलिंगी लोकांसाठी हा कायदा कसा लावता येईल हे लक्षात येत नाहीये पण लावला गेला पाहिजे. 'अडलट्री' समलिंगी लोकांच्या आयुष्यात घडू नये.

भारतीय कायद्यात अ‍ॅडल्टरी आहे. सेक्शन ४९७च्या अनुसार अ‍ॅडल्टरी हा गुन्हा आहे. मात्र पुरुषानं विवाहित स्त्रीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित केले असतील तरच. त्यातही माझ्या समजुतीप्रमाणे गुन्हा हा फक्त पुरुषावरच दाखल होऊ शकतो. तसंच, ती स्त्री जर विधवा किंवा अविवाहित असेल, तर या कलमाखाली गुन्हा दाखल करता येत नाही. शिवाय गुन्हा दाखल होण्यासाठी त्या विवाहित स्त्रीच्या पतीची हरकत असायला हवी. जर वाईफ स्वॉपिंग करणार्‍या कोणाचीच हरकत नसेल, तर तो गुन्हा ठरत नाही. जर पतीची संमती असेल, पण पत्नी तयार नसूनही वाईफ स्वॉपिंग केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. अ‍ॅडल्टरीचा नाही.

असो. याचा विषयाशी संबंध नाही.

Pages