सोशल नेटवर्कचा चित्रकला प्रसारासाठी उपयोग

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

फेसबुक आणि इतर सोशल नेट्वर्क्समुळे कित्येक चित्रकारांची कामं रेग्युलरली पाहाता येतात, आपल्या कामांवर अनेकांच्या प्रतिक्रिया आणि सुचना मिळतात. अनेक आंतराष्ट्रीय आर्ट सोसायटीज ची स्वतःची फेसबुक पेजेस आहेत आणि आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक ऑनलाईन स्पर्धा FB वर आयोजल्या जातात.
इथे लिहायचे प्रयोजन म्हणजे मुंबईतल्या दोन प्रतिथयश चित्रकारांनी FB वर चित्रकले साठी चालवलेल्या प्रयत्नांची माहिती करुन देणे.
श्री. प्रदीप राऊत- जेहांगीर बाहेर गेली २५ वर्षे प्लाझा आर्ट गॅलरी चालते, इथे अनेक नवोदिताना विनामुल्य चित्र प्रदर्शीत करायची संधी मिळते. या गॅलरीशी संबंधीत चित्रकार प्रदिप राऊत हे स्वतः अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीची चित्र काढतात मात्र आपल्या कला महाविद्यालईन दिवसात त्यांनी लँड्स्केप, पोर्ट्रेट , रीअ‍ॅलिस्टिक असे खुप काम केलेले आहे. त्या दिवसांना उजाळा म्हणुन आणि नविन चित्रकाराना प्रोत्साहन म्हणुन ते गेले काही महिने ऑन्लाईन लँड्स्केप स्पर्धा आयोजित करतायत आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभतोय.
त्यांच्या FB पेज चा दुआ
https://www.facebook.com/pradip.raut.313

श्री. वासुदेव कामथ - अमेरिकन पोर्ट्रेट सोसायटीचे मानाचे "ग्रँड ड्रेपर अ‍ॅवार्ड विजेते" चित्रकलेच्या दुनियेतले मोठे नाव.
त्यांनी Portrait artist group initiated by Vasudeo Kamath हा ग्रूप
https://www.facebook.com/groups/217380251768906/ इथे चालू केलाय. तेथे पोर्ट्रेट ची मासिक स्पर्धा होते आणि त्यातले १२ विजेते लाईव्ह पोर्ट्रेट स्पर्धेसाठी निवडले जातील. यातिल विजेत्याला येक मोठ्या रकमेचे बक्षिस दिले जाईल आणि यातुन येक चळवळ उभी राहावी ही अपेक्षा.
चित्रकारांनी चित्रकारांसाठी चालवलेल्या या दोन प्रयत्नांची नोंद म्हणुन हे लेखन

विषय: 
प्रकार: 

मलाही सहभागी व्हायला आवडेल. किती वेळ देऊ शकेन ते माहीत नाही. पण आवडेल हे नक्कीच.मला जलरंग वापरायची भिती वाट्ते. या शाळेत त्यावर मात करायचा नक्की प्रयत्न करेन.
प्लिज माझे नाव यादीत टाकाल का?

पाटील सर , बघा तुमच्या कार्यशाळेला छान प्रतिसाद मिळेल हे माझे भविष्य खरे ठरले म्हणायचे Happy

माझंही नाव मी ह्या कार्यशाळेसाठी नोंदवून ठेवतेय Happy (समजा माझ्याऐवजी माझी मुलगी सहभागी झाली तर चालेल का?)

ए प्लि़ज माझं ही नाव घ्या , इयत्ता १० नंतर मी चित्रकला केलेली नाही [कंटाळवाण्या मिटिंग्ज मध्ये मात्र अजुनही माझ्या चित्रकलेला डायरीच्या मागच्या पानावर बहर येतो.] पण मला खरंच पेंटिंग शिकायचं आहे.

मलापण यायला आवडेल कार्यशाळेत…एंटरमिजिएट नंतर फारशी चित्रं कधी काढली नाहीत.घरात सामान आहे ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने सुरुवात होईल.

प्रदिप राऊत यानी FB वर जी लँड्स्केप स्पर्धा चालवली होती त्यातील मासिक विजेत्यांची स्पर्धा आज मुंबईट फोर्ट भागात होतेय. सगळे स्पर्धक CST ते कुलाबा येथील जागांचे लॅव्ड्स्केप करतील आणि यातील विजेत्याला १ लाखाचे पारितोषीक मिळेल. हि रक्कम सुध्हा FB वर आवाहन करुन जमा केली गेली हे खास.

Pages