जयपूर शहर

Submitted by शर्मिला फडके on 15 January, 2014 - 00:05

जयपूर लिटरेचर फेस्टीवलच्या निमित्ताने मी जयपूर शहरात १७ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत आहे. दिवसभर लिटफेस्टच्या ठिकाणी (डिग्गी पॅलेस) बिझी असले तरी संध्याकाळी जयपूर शहर शक्य असेल तितके बघायची इच्छा आहे. हे कसे आणि कितपत शक्य होईल माहीत नाही. कोणी मार्गदर्शन करु शकेल का?
अनवट जागा, खाण्याची, खरेदीची ठिकाणे वगैरे सांगा.
सांगानेरला जाऊन तिथला हॅन्डब्लॉक प्रिन्टिंगचा उद्योगही पहायचा आहे, ते जमू शकेल का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांगानेरला जाऊन तिथला हॅन्डब्लॉक प्रिन्टिंगचा उद्योगही पहायचा आहे, ते जमू शकेल का?>> हो ते जयपूर सिटीपासून खूप काही लांब नाहीये. तिथे जाणे शक्य आहे.
मी मागे लिहीले होते मी राजस्थानची माहिती लिहेन. ते राहिलेच. आता परत जाउन शोधते.

स्वाती प्लिज सांग तुला जयपूरबद्दल जी काही वेगळी माहिती असेल ती.

नेहमिच्या टुरिस्टी ठिकाणांचा बहुधा फार उपयोग नाही, ती कितपत बघता येतील माहीत नाही, कारण संध्याकाळपर्यंत बहुतेक दरवाजे बंद होतात.

तुम्ही संध्याकाळी लाईट & म्युझिक शो बघायला "आमेर" किल्ल्यत जाउ शकता. खुप सुरेख अनुभव. सधारण्तः ६ पासुन शो सुरु होतात थंडीत. अंधार पडला की शो असतो. वेब साइट वर कळेल.

शॉपिंग साठी खच्चुन दुकाने आहेत. पण नीट बघुन घ्यावे लागते. साधारण पणे जे स्वस्त असते त्याकापडांचे रंग जातात. ब्लॉक प्रिंट मस्त मिळते. राजस्थाली म्हणुन गव्हर्न्मेंट चे दुकान आहे ते झकास आहे.

http://rajasthalitest.rajasthan.gov.in/

हवा महालाजवळ बर्‍याच ठिकाणी उत्तम कुल्फी मिळते, एकंदरीत कचोरी टाइप्स स्नॅक्ससाठी रावत (का लक्ष्मी?) मिठाई.

एकंदरीत कचोरी टाइप्स स्नॅक्ससाठी रावत (का लक्ष्मी?) मिठाई.>> दोन्ही.

Mawa Kachori - Rawat sweets and Kanji sweets near the bus stand and at LMB.
Ghewar Jaipur Speciality The best shops for this are LMB at Johri Bazar and Rawat Sweets.

LMB - near Johri Bazar,BaniPark, famous for Rajasthani ethinic food, DMB Spl Thali
Rawat Misthan Bhandar - near Station Road famous for Sweets
Lassiwala - Panch Batti chowk, MI Road for great local food
Natraj Restaurant - Panch Batti Mirza Ismail Road for great local food

वॉव.. स्वाती, खाद्यभ्रमंतीकरता उपयुक्त माहिती Proud