नाव त्याचे लावलेले खोडले मी

Submitted by कमलेश पाटील on 12 January, 2014 - 09:14

सोवळ्याने देव सारे चोरले मी,
चार वासे मोडलेले चोरले मी.

घाव गहिरे झेललेले सांधताना,
वेदनेला आतल्या गोंजारले मी.

मोकळ्या गावात बांधुनी निवारे,
पाश सारे माणसांशी तोडले मी.

दार हे थोडे सुखाचे लोटताना,
का दु;खाला उंबर्‍याशी भेटले मी.

जोडलेले स्वप्न वेडे मोडताना,
का नव्याने अर्थ त्यचे लावले मी?

सोस हा काळ्या मण्यांचा तोडताना,
नाव त्याचे लावलेले खोडले मी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमलेश खूप दिवसांनी /वर्षांनी दिसत आहात बरे वाटले
असो

गझल कमी आवडली शेर फारसे अपील झाले नाहीत व्यक्तिशः मला .. अनेक खयाल मात्र आवडले
जयदीप ह्यांचे मत पटले
लय जरा अजून चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती
वृत्तात काही जागी चुका आहेतच ..बांधुनी (शेर ३) दु:खाला (शेर ४)
त्यचे (शेर ५)हा टायपो असावा
शेवटचा शेर तुमच्या खास शैलीत असल्याने खास वाटला असे म्हणत आहे

धन्यवाद