कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा (तरही)

Submitted by इस्रो on 11 January, 2014 - 07:19

तनी मनी एकदा पुन्हा तशीच तू दरवळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा

"निघून जा!" बोललो असे तुला जरी रागवून मी
जरा थबक अडखळून अन हळूच मग तू वळून जा

कधी असे पाहिजे तुला कधी तसे पाहिजे तुला
खरी खरी नेमकी मला सखे जरा तू कळून जा

तुझी नि माझी भले असो दिशा निराळी अता जरी
घराजवळ रोज माझिया उगाच तू घुटमळून जा

नकोस 'नाहिद' जळू असा भले कुणाचे बघून तू
दिव्यापरी कर प्रकाश अन खुशाल मग तू जळून जा

-नाहिद नालबंद
[९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर...

>>
कधी असे पाहिजे तुला कधी तसे पाहिजे तुला
खरी खरी नेमकी मला सखे जरा तू कळून जा>>

सर्वांत विशेष

खूप सुंदर!
तुझी नि माझी भले असो दिशा निराळी अता जरी
घराजवळ रोज माझिया उगाच तू घुटमळून जा>>> हे विशेष आवडले!

wahh