'' पुढच्या जन्मा''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 9 January, 2014 - 01:42

जलप्रपात मी कोसळणारा , ना कुणास सावरणारा
फोडू बघतो कातळ सारे पण प्रवाह आवरणारा

निर्विवाद आणिक अनिर्बंध मृत्यूवर माझी सत्ता
बेताल वागण्यामधील माझ्या शिस्तीचा मी भोक्ता

जुळवू बघतो धागेदोरे,या जन्माचे त्या जन्मा
भेटणार आहेस का मला ,असल्या-नसलेल्या जन्मा

मी वाट पाहतो मृत्यूची , असलेल्या (?) पुढच्या जन्मा
मी वाट पाहतो मृत्यूची , नसलेल्या (?) पुढच्या जन्मा

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्विवाद आणिक अनिर्बंध मृत्यूवर माझी सत्ता
बेताल वागण्यामधील माझ्या शिस्तीचा मी भोक्ता<<< व्वा

समजल्यासारखी सुद्धा वाटते आणि पुरेपूर समजली सुद्धा नाही.....अश्या धाटणीची कविता लिहिली,की आपण आपसूकच दिग्गज कवींच्या पंक्तीत सामिल होतो.

Wink

जोक्स अपार्ट... सर्वांचा आभारी आहे.

जलप्रपात मी कोसळणारा , ना कुणास सावरणारा
फोडू बघतो कातळ सारे पण प्रवाह आवरणारा

निर्विवाद आणिक अनिर्बंध मृत्यूवर माझी सत्ता
बेताल वागण्यामधील माझ्या शिस्तीचा मी भोक्ता

व्वा. पुढे कवितेची दिशा कळली नाही.

अरेरे... काव्य फसले म्ह॑णायचे.... Sad

एका अतिशय भावनाप्रधान आणि मानसिक दोलायमान अवस्थेत हे काव्य प्रसवले गेले.... अवघ्या काही मिनिटात ( आयला...प्रोफेसर चावले की काय मला)

साधना आपल्याशी आणि समीर तुझ्याशी पण..प्रत्यक्ष बोलतो मित्रा.

Happy