किंगफिशर उर्फ खंड्या आणी चिमणी - कथा चित्रपट - ससा आणी कासव!

Submitted by यक्ष on 8 January, 2014 - 03:13

तर आज किंगफिशर उर्फ खंड्या ह्याविरुद्ध फसवणुकिच्या तक्रारिबद्दल वाचले!तक्रार तिही त्याच्याच जंतुंकडून!

मला अजून आठवते कि खंड्याला स्वतःच्या चंचलतेचा, रंगिबेरंगी पंखांचा किती टोकाचा गर्व होता!!

त्याच्या अधिकारात असलेले किडे व जंतुही 'अँक्वायर्ड' रंगामुळे किती गर्विष्ठ्पणे तोर्‍यात मिरवायचे!

एवढे की खंड्यासोबत एक चिमणीही उड्डाण करवयची तर तिला ह्या खंड्याचे जंतुही हिडिस्फिडिस करवयाचे!
तिला हिणवायचे कि तु टुकार अन अगदी 'साधारण' आहेस!चिमणी बिचारी मुकाट आपले काम करत रहवयची. परिस्थितिच्या रेट्यामुळे म्हणा वा अन्य करणामुळे म्हणा.. चिमणी 'खंड्याला' 'शरण' गेली!

खंड्याच्या माजोर्डेपणाला अजून उधाण आले. तो 'उंच उंच माझा झोका !!' म्हणत म्हणत एवढा वर गेला कि जमिन दिसेनाशी झली!पण मर्यादेपेक्षा वर गेल्यावर व्हायचे तेच झाले! त्याचा तोल गेला. सोबतचे जंतु पार झट्कून टाकले! जबाबदरिही झटकली! जंतू अगदी सैरभैर झाले...निराश झाले!खंड्याचा पार 'पोपट' झाला....रादर पोपट खूप बरा अशी त्याची अवस्था झाली!

तर मंडळी! लहानपणची 'ससा व कासव' ही गोष्ट प्रकर्षाने आठवली!

अन तरुणपणी पाहिलेला सई परांजपेचा 'कथा' चित्रपट डोळ्यासमोर तरळून गेला!! तिने अश्या प्रवृत्ती अगदी चपखलपणे मांडल्या होत्या! त्या आपल्या आजुबाजुला असतातच. आपले डोळे मत्र उघडे ठेवणे आवश्यक! हो अन डोकेही!

-एक 'मस्तमौला व स्वानंदी' कासव!!:-)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users