मला सांग सारांश माझ्या चुकांचा

Submitted by जयदीप. on 7 January, 2014 - 14:50

तुला जी सजा तीच आहे मलाही
तुझ्या आठवांची उधारी अताही!

मला सांग सारांश माझ्या चुकांचा
तसा वेळ नाहीच आहे तुलाही

कशाला तुला दोष देऊ नव्याने?
तुला खात आहे तुझे मन अताही!

तसे खूप आहेत रस्ते मनाचे
कुठे जायचे ज्ञात नाही कुणाही

मनाचा विसरलो नकाशा तुझ्या मी
तुझ्या आठवेनात खाणा खुणाही

तिथे पोचलो मी हरवलो जिथूनी
मला दाखवेनात रस्ता दिशाही

==================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा. अप्रतिम गझल.
सजा जी असा वापर शक्यतो टाळावा. कानाला चांगला वाटत नाही.
शब्दक्रम बदलून सहज टाळता येईल.
खजीना ऐवजी खजाना चालेल. वगैरे.

हा शेर सगळ्यात आवडला.
तसे खूप आहेत रस्ते मनाचे
कुठे जायचे ज्ञात नाही कुणाही

मत्लाही विशेष.

तुला जी सजा तीच आहे मलाही
तुझ्या एवढी आज माझी तबाही !

कशाला तुला दोष देऊ नव्याने?
तुला खात आहे तुझे मन अताही!

तसे खूप आहेत रस्ते मनाचे
कुठे जायचे ज्ञात नाही कुणाही

व्वा ! छान गझल !

तुला जी सजा तीच आहे मलाही
तुझ्या एवढी आज माझी तबाही !

तसे खूप आहेत रस्ते मनाचे
कुठे जायचे ज्ञात नाही कुणाही >>> हे दोन सर्वात छान वाटले.

------------------------------------------------------------------------------------------------------------

पहिल्या शेरात 'तबाही' आणि शेवटच्या शेरात 'खजाना'
हे अमराठी शब्द वापरण्याचे प्रयोजन समजले नाही.

मराठी रचनेत अमराठी शब्द वापरताना, तसेच काही विशिष्ट कारण, (म्हणजे मूळ संकल्पना परक्या भाषेतून आली असेल किंवा अमराठी शब्द मराठी शब्दापेक्षा अधिक खोल आशय व्यक्त करत असेल) असेल तर वापरले जावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. अमराठी शब्दांवर किंवा अन्य भाषांवर आक्षेप नाही हे कृपया ध्यानात घ्यावे.

खजीना मराठी ?
हा कबीराचा दोहा, ज्यात हा शब्द वापरलायः

धन दौलत ही माल खजीना देखत है सपना
समज मना कुहि नहीं आपना

मराठीत खजिना वापरतात असे वाटते.

सर...असं काही विशेष प्रयोजन नव्हतं...पण 'तबाही' हा शब्द मला खूप योग्य वाटला एका शब्दात बरच काही सांगायला...
तसेच 'खजाना' च्या बाबतीत... कारण खजाना हे फ्लो मध्ये व्यवस्थित बसतं खजीना पेक्षा असं वाटलं.

...प्रांजळ प्रतिसाद मनाला आनंद देऊन जातो... म्हणून मला मा.बो वरील प्रतिसाद जास्त फील होतात... Happy
धन्यवाद काका...