आई (नर्मदाकाठच्या कविता )

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 January, 2014 - 13:48

तुझ्या पाण्यावर तरंगणारी
छोट्या छोट्या दिव्यांची रांग
त्या तेजाने उजळलेले तुझे रूप
पाहता पाहता मला
माझी आई आठवली
देवा समोर डोळे मिटलेली
तशीच सात्विक उजळ
माझा जीवनाधार असलेली
अन जाणवले
ती तूच होतीस तिथे
ती तूच आहेस इथे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांतजी सध्या रेवामैयाच्या प्रेमात न्हाऊन निघालेत अग्दी आणि शब्दातूनही वाचकांना तोच अनुभव देताहेत ... अगदी प्रसन्न, पवित्र अनुभव ... ____/\_____

Happy