अद्वैत

Submitted by चाऊ on 5 December, 2008 - 09:11

पुसुन गेल्या वाटलं सार्‍या खाणाखुणा
विरुन गेला वार्‍यात, एक पुराणा तराणा
रंग कोवळे रेशमी हळुवार भावनांचे
न बोलता कळावे, अर्थ त्या खुणांचे
अद्वैत ते अनोखे, जुळ्या, खुळ्या, जीवांचे
होईल वेगळे का? नीरक्षीर एकसाचे
झाले तरीही द्वैत, हे भोग प्राक्तनाचे
अंतर अनंत झाले दोन्ही तना मनांचे
दाटे धुके सभोती गडद अंधाराचे
त्यातुन पुन्हा फुटले आदीत्य पहाटेचे
झंकारले तनमन ते स्वप्न समोर दिसता
फ़ुटती नवे धुमारे अवचित भेट होता

गुलमोहर: 

जिवा शिवाचा संग अन साथ कविमनाची .....
कसे भान राहील मित्रा वास्तवाचे...सुरेख !

सस्नेह...

विशाल.