मरणे थोडे, जगणे थोडे

Submitted by जयदीप. on 3 January, 2014 - 07:37

रडणे थोडे, हसणे थोडे
मरणे थोडे, जगणे थोडे

पैसे, पैसे, पैसे, पैसे...
असणे थोडे, नसणे थोडे

नाते माझे-यांचे-त्यांचे
जुळणे थोडे, तुटणे थोडे

जगणे भलते सोप्पे आहे
विणणे थोडे, विरणे थोडे

संधीमधले फसवे सोने
मिळणे थोडे, मुकणे थोडे

माझे माझ्या वरती आहे
झुकणे थोडे, नमणे थोडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही शेर आवडले
पण त्याहीपेक्षा एकाच ओळीत दोन एकाच कवाफीतले शब्द आणि रदीफ असलेला शब्द दोनदा हा फॉर्म्यूला आवडला Happy