आता इथला झालो आहे

Submitted by जयदीप. on 1 January, 2014 - 04:57

इतका परका झालो आहे
मला पाहुणा झालो आहे

इतका हळवा नव्हतो मी पण
नकळत आता झालो आहे

खोटे हसणे शिकलो आहे
आता मोठा झालो आहे

कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे

तुझा कधी ना होऊ शकलो
तसा कुणाचा झालो आहे?

-जयदीप

(थांबायला होत नाही.. अजून लिहीन म्हणतो ..पुन्हा क्षमस्व.. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा. सहज आहे. गझल फार आवडली.

कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे

खोटे हसणे शिकलो आहे
आता मोठा झालो आहे

कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे

तुझा कधी ना होऊ शकलो
तसा कुणाचा झालो आहे?

व्वा!

शेर अगदी मस्त, सुलभ. शेवटच्या शेरातला खयाल न्युमरसली रीपीटेड असला तरी चांगला वाटत आहे तो शेर.

उगाच आव आणून लिहिण्यापेक्षा मनापासून लिहिले की गझल भिडते हे अनेकदा सिद्ध झालेले आहे तुम्ही ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे जयदीप, मनःपूर्वक शुभेच्छा!

सर्वांचे मनापासून आभार.

तुमचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभल्यामुळे इथवर आलो आहे. पण एक असंतोषसा मनात आहे..लिखाणाबद्दल.

प्रयत्न चालू आहेत....

इतका हळवा नव्हतो मी पण
नकळत आता झालो आहे

खोटे हसणे शिकलो आहे
आता मोठा झालो आहे

कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे


तुझा कधी ना होऊ शकलो
तसा कुणाचा झालो आहे?

वा.. आवडली गझल.

उगाच आव आणून लिहिण्यापेक्षा मनापासून लिहिले की गझल भिडते हे अनेकदा सिद्ध झालेले आहे तुम्ही ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे जयदीप, मनःपूर्वक शुभेच्छा!

सहमत. Happy