मी श्रीमंत...

Submitted by पल्ली on 30 December, 2013 - 08:56

माझ्याकडे नाही ए.सी.
नाही मायक्रोवेव
माणूस म्हणून मी जागा आहे
बघतोय माझा देव.
गाडी नाही माझ्याकडे
ना खातो मी पिझ्झा
श्लोक म्हणतो पूजा करतो
साधा संसार माझा.
फुलक्यासंगे भाजी चापतो
वांगी घेउन पावशेर
महिनाभर मी हिशेब लावतो
बँकेमध्ये बराच उधेर
आमच्या 'हीला' सोस नाही
दागिन्यांचा नसता घोर.
मला खरेदी आवडत नाही
गर्दीमध्ये होतो बोर.
आज महिना अखेरीला
खिशात ऊरले नाणे आहे
मस्त फिरत शिळ घालतो
ओठावरती गाणे आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज महिना अखेरीला
खिशात ऊरले नाणे आहे
मस्त फिरत शिळ घालतो
ओठावरती गाणे आहे...

वा.. क्या बात है , सूंदर आशयाची कविता

खास...

वा पल्ली छानच लिहितेस तू
एक शेर आठवला
(अर्थात नेहमीप्रमाणे माझाच्चय सहन करणे प्लीज )

साधेसुधे जगण्यामधे आनंद मानावा खरा
मिरवायला जमते मला ही कल्पना नटमोगरी