ते ते भरून आले

Submitted by देवा on 26 December, 2013 - 23:28

त्या आतल्या सुराने सारे कळून आले
हरखेल शब्द नवखा इतके जुळून आले

मी मोकळा जरासा तू ही तशीच मुक्त
हे नाळ जोडलेले बंधन कुठून आले

चल रोजच्याप्रमाणे घेऊ हसून थोडे
बघ रोजच्याप्रमाणे सारे घडून आले

डोळ्यातल्या जळाला हलकेच साद आली
तू बाहले जयांना ते ते भरून आले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मोकळा जरासा तू ही तशीच मुक्त
हे नाळ जोडलेले बंधन कुठून आले

चल रोजच्याप्रमाणे घेऊ हसून थोडे
बघ रोजच्याप्रमाणे सारे घडून आले <<< वा वा

मी मोकळा जरासा तू ही तशीच मुक्त
हे नाळ जोडलेले बंधन कुठून आले>>

ही द्विपदी आवडली..

धन्यवाद मित्रहो .
तुम्हाला सर्वांना वेगवेगळ्या द्विअपदी आवडल्या. एकुणात कविता आवडली असती तर अधिक आनंद झाला असता. अर्थात ते मी कवितेचे अपयश मानेन.

वाह एकच नंबर
माझ्यामते संपूर्ण रचनाच सर्वाना आवडली असणारच पण त्यातल्यात्यात सर्वाधिक काय भिडते आहे हे पाहण्याचा वाचकांचा स्वभावच/सरावच असतो जे साहजिकही आहे
:अवांतर : अर्थात ह्यालाही अपवाद असतात वरून ७वा प्रतिसाद ..कितीही शेर छान असले तरी दोनच अधिक आवडून घ्यायचे असा आमच्या उकाकांचा दंडक आहे असे ऐकीवात आहे
(उकाका गम्मत करतोय बरका :))