मी तुला हरवूनही मी जिंकलो होतो किती?

Submitted by जयदीप. on 24 December, 2013 - 00:00

तू मला सांगू नको मी झिंगलो होतो किती...
माहिती माझे मला मी संपलो होतो किती !

तू मनाशी ठरवले -मी रंगलो होतो किती
ना, तुला ना उमगले- मी रापलो होतो किती !

गुंतताना कळत नाही गुंततो आहे किती
थांबल्यावर जाणतो मी गुंतलो होतो किती !

उत्तरांनाही हवासा प्रश्न माझ्यासारखा
उत्तरे स्वीकारण्या मी झुंजलो होतो किती?

दु:ख पडले अंगवळणी, दु:ख वाटे आपले
आपला माझ्या सुखा मी वाटलो होतो किती?

का नशीबा मिरवशी हे जिंकणे असले तुझे...
मी तुला हरवूनही मी जिंकलो होतो किती?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

गुंतताना कळत नाही गुंततो आहे किती
थांबल्यावर जाणतो मी गुंतलो होतो किती

मस्त शेर.

दोनतीन शेरांच्या दुसर्‍या ओळीत 'मी'ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दुसर्‍या 'मी' च्या जागी 'की' हा शब्द चपखल वाटेल असे सहज सुचवावेसे वाटत आहे. गै.न.

----------

अवांतर : वरच्या शेरावरून एक माझा शेर आठवला,

ह्याच कारणासाठी रडलो तू जाताना
किती गुंतलो कळण्यासाठी मीटर नसते

धन्यवाद व शुभेच्छा!

व्वा सर.... मस्त....धन्यवाद.... Happy

>>>ह्याच कारणासाठी रडलो तू जाताना
किती गुंतलो कळण्यासाठी मीटर नसते>>>

व्वा.... Happy सॉलिडच!

-------------------------------------------------

सर....

मतला थोडा बदलला आहे... शेवटच्या शेरात की चपखल वाटेल का?

छान

गुंतलो आणि जिंकलो हे सर्वात छान.

थांबल्यावर जाणतो मी गुंतलो होतो किती ! >>> ही ओळ
"गुंतल्यावर जाणले मी गुंतलो होतो किती"
अशी वाचून पाहिली.

गुंतताना कळत नाही गुंततो आहे किती
थांबल्यावर जाणतो मी गुंतलो होतो किती !

दु:ख पडले अंगवळणी, दु:ख वाटे आपले
आपला माझ्या सुखा मी वाटलो होतो किती?

आवडले हे शेर.

अनपेक्षित पणे इथे 'हे लेखन आवडलेले माय्बोलीकर' मधे १ दिसत आहे...
Happy

हे कसं कळावं की कोणाच्या निवडक १० त ते आहे?