नशा

Submitted by UlhasBhide on 19 December, 2013 - 04:56

नशा

कोणाला इतकी चढते की
चढली हेही समजत नाही
का चढली ना ? या चिंतेने
काहीबाही बरळत राही

पेल्यावर पेले रिचवूनी
कुणी नशा उपभोगत असतो
नशाच होते दासी त्याची
तो न नशेच्या अधीन असतो

त्याला मिळते, मी का वंचित
याच नशेने झुरतो कोणी
आनंदाच्या क्षणांमधेही
सदैव गातो तो रडगाणी

नशीबात लिहिलेली तितकी
पिऊन कोणी सुखात जगतो
अर्ध्यामुर्ध्या पेल्यामध्ये
पूर्ण नशेने मस्त झिंगतो

यश, समृद्धी, प्रेम, प्रसिद्धी,.... ज्याची त्याची नशा निराळी
किती करावी, कशी करावी.... प्रत्येकाची रीत आगळी

.... उल्हास भिडे (१९-१२-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उल्हास
शेवटच्या दोन ओळिंपर्यंत पोहोचेपर्यंत कविता ठिकठाक वाटत होती.
पण विदिपाने म्हटल्याप्रमाणे कवितेचं सार त्यात आले आहे.
आवडली कविता....

अरेच्या, ही कविता कशी काय सुटली नजरेतून ???

उकाका, मस्त मांडणी आहे आणि विषयाची व्याप्ती शेवटच्या दोन ओळीत तर अगदी सुरेख आलीये ...

जाम पे जाम पीने से क्या फायदा दोस्तों
रात को पी हुयी शराब सुबह उतर जाएगी!
अरे पीना है तो दो बूंद प्यार के पी के देख
सारी उमर नशे में गुज़र जाएगी!