[का.का.क] लेखकु

Submitted by चायवाला on 17 December, 2013 - 00:33

कविता माझी वाच, कथा माझी वाच
लेख नक्की वाच, लेखकु म्हणे

आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी

ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर
टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि

आव पिडीताचा, सात्विक संतापाचा
वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो

वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी

ओलावले डोळे, भारावले मन
शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे

दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद
वर आणण्याचा नाद, लेखनाला

इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान
काढी फेसबुकी पान, स्वत:चे

नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित
सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा ||

--------------------------------------------------------------------------------------------------------
नारबाची वाडी पाहून नारो म्हणेच्या धर्तीवर लिहायचे होते.
अचानक लिहीता लिहीता हेच लिहून झाले.
ही काहीच्या काही कविता आहे. त्याच अर्थाने घ्यावी.
कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही. धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी
>>>

स्वानुभव वाट्टं Proud Light 1

भारीये Lol
अनेक लोकांना अनेक महिन्यांनतर लोकांन धन्यवाद द्यायची हुक्की येते आणि लेख / कथा/ कविता वर काढले जातात. अनेक लोकं खाजगीतुन अनेकांना माझ्या कवितांवर प्रतिसाद द्या सांगतात आणि कविता वर काढुन घेतात ते ही राहिलं...
वाढवं ओव्या भारी जमतील Lol

पोटेंशिअल तो तुझमे है ही Happy

नारबाची वाडी पाहून नारो म्हणेच्या धर्तीवर लिहायचे होते.
अचानक लिहीता लिहीता हेच लिहून झाले. >> बोअर वाटेल तुम्हाला पण छंद समजून लिहिलं असतं तर जमलंही असतं. ६ - ६ - ६ - ४ अशी अक्षरसंख्या आणि दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक इतकं सोप्पं आहे ते. पुन्हा प्रयत्न करा !

ही काहीच्या काही कविता आहे. >> मान्य !

असेच लिहीत राहिलात तर तुम्हालाही पुष्पक विमानात बसता येईल.>>>

कोथरूडला चांदणी चौकातून खाली आली की लागते ते पुष्पक विमान का? Light 1 Lol

<<वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी<,
<,आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी<,
हे भारीयेत Rofl

दिनेशदा तुमच्या सूचनेनुसार
.
.
.
.
.
.
सर्व नवीन प्रतिसादकांचे धन्यवाद Wink Proud

दिनेशदांच्या सूचनेला मी दिलेल्या आभाराबद्दल मला उदयने धन्यवाद दिल्याबद्दल त्याचे आभार Proud

Pages