भास

Submitted by जयदीप. on 15 December, 2013 - 13:12

का मला मी शोधण्याचा ध्यास होतो?
जिंकल्यावर हारल्याचा भास होतो...

प्यायलो कोळून माझ्या आसवांना
वेदनांना आज माझा त्रास होतो

पोचलो पोचायचे होते जिथे मी..
का मला मी पोचल्याचा भास होतो?

वेदनांना संपताना पाहिले मी
संपण्याला गर्व थोडा बास होतो

टाळतो उल्लेख आता मी चुकांचे
मी तसा माझ्या चुकांचा खास होतो

तू मला नेलेस माझ्यातून आता
मीच माझी शेवटीची आस होतो..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तसा माझ्या चुकांचा खास होतो

तू मला नेलेस माझ्यातून आता
मीच माझी शेवटीची आस होतो..

बाकी शेरात अर्थासाठी बुचकळ्यात पडायला होते आहे ..वै म गै न
भास मत्र तसा छानचय पण जरा वेळ लागला समजायला