शेर

Submitted by विजय दिनकर पाटील on 11 December, 2013 - 00:10

स्वतंत्र धागा उघडला गेला असल्याकारणाने संपादित करीत आहे. आभार कैलासराव!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देखण्या गावास देहाची सहल ठरली
पाहतो येतात सोबत कोणत्या व्याधी

किती तर्‍हेच्या अतर्क्य घटना रटाळ गोष्टी म्हणजे जीवन
अनेक वर्षे रखडवलेला डेली सोप बरा एखादा

पाट्या टाकत ये जा करतो कायम एकच रस्त्याने
पूर्वी पायी आता गाडी हेच काय ते न्यारेपण<<< शेर फार आवडले

पाट्या टाकत ये जा करतो कायम एकच रस्त्याने
पूर्वी पायी आता गाडी हेच काय ते न्यारेपण

व्वा व्वा…

सुंदर शेर आहे.

मतभिन्नता पण आवडला.

'सरळ वाटू लागतो का घाट वेडावाकडा' या मिसऱ्यात, 'सरळ' शब्दाचा 'गाल' अशा लगावलीत वापर झाला आहे.

पण 'सरळ' शब्दाची लगावली 'लगा' किंवा 'ललल' अशी होऊ शकेल माझ्या मते. काही चुकत असल्यास जरूर सांगावे. उच्चारण्यात फारसा त्रास होत नाहीये हे ही खरेच.

शुभेच्छा.

पण 'सरळ' शब्दाची लगावली 'लगा' किंवा 'ललल' अशी होऊ शकेल माझ्या मते. काही चुकत असल्यास जरूर सांगावे. उच्चारण्यात फारसा त्रास होत नाहीये हे ही खरेच.>>>

मला 'सरळ' ह्या शब्दाचा उच्चार करताना 'लगा' किंवा 'गाल' अशी कुठली डिंस्टींक्टली स्पेसिफिक लगावली येत नाही असे वाटते त्यामुळे 'गाल' अशी योजना केली आहे.

'ललल' तर आहेच त्याबद्दल शंका नाही.

व्वा ! अनेक शेर आवडले ..खयालही खूपसे नाविन्यपूर्ण !
पहिले दोन आणि शेवटचे दोन शेर तर विशेष आवडले . Happy

देखण्या गावास देहाची सहल ठरली
पाहतो येतात सोबत कोणत्या व्याधी...वा वा

पाट्या टाकत ये जा करतो कायम एकच रस्त्याने
पूर्वी पायी आता गाडी हेच काय ते न्यारेपण......क्या बात !

देखण्या गावास देहाची सहल ठरली
पाहतो येतात सोबत कोणत्या व्याधी......उत्तम शेर.

इतरही शेर छानच.