माझे असून नसणे...

Submitted by जयदीप. on 10 December, 2013 - 22:04

सुप्रियाजींची गझल वाचून 'काही' ही रदीफ घेऊन गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

माझे असून नसणे करते उरात काही
आतून आरशाच्या सलते मनात काही

घेऊन दूर गेलो माझे मला असे मी
आहे न ठेवले मी माझे कुणात काही

माझा न राहिलो मी ऎकून एक गाणे
होते मनात थोडे, होते सुरात काही

नि:शब्द वादळांचे देतोस तू तडाखे
आहे तुझ्या नशीबा मौनात बात काही

माझे तुझे न होणे होते ठरून गेले
संदर्भ देत आहे माझाच हात काही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घेऊन दूर गेलो माझे मला असे मी
आहे न ठेवले मी माझे कुणात काही

नि:शब्द वादळांचे देतोस तू तडाखे
आहे तुझ्या नशीबा मौनात बात काही

प्रॉमिसिंग, सफाई अपेक्षित.

घेऊन दूर गेलो माझे मला असे मी
आहे न ठेवले मी माझे कुणात काही

माझा न राहिलो मी ऎकून एक गाणे
होते मनात थोडे, होते सुरात काही

नि:शब्द वादळांचे देतोस तू तडाखे
आहे तुझ्या नशीबा मौनात बात काही

माझे तुझे न होणे होते ठरून गेले
संदर्भ देत आहे माझाच हात काही<<< व्वा

माझा न राहिलो मी ऎकून एक गाणे
होते मनात थोडे, होते सुरात काही<<< सर्वोत्तम

गझलियत तुमच्यात ठासून भरलेली आहेच कणखरजी म्हणत आहेत त्यप्रमाणे आता सफाई बाबत अधिक सतर्क रहावे

अख्खी गझल आवडली. Happy

बाय द वे , मतल्यामध्ये दुसर्‍या ओळीत आरसा हवाच.. असा काही अट्टाहास आहे का तुमचा?
डोन्ट माईंड.. जस्ट अ‍ॅन ओब्झर्वेशन! Happy

शलाकाजी...खूप दिवसांनी....

धन्स....

खूप खूप आभार...
Happy

घेऊन दूर गेलो माझे मला असे मी
आहे न ठेवले मी माझे कुणात काही

नि:शब्द वादळांचे देतोस तू तडाखे
आहे तुझ्या नशीबा मौनात बात काही

माझे तुझे न होणे होते ठरून गेले
संदर्भ देत आहे माझाच हात काही

वा वा आवडले हे शेर .