आवाहन...

Submitted by बागेश्री on 10 December, 2013 - 09:08

जमिनीच्या भूर्जपत्रावर
झाडांच्या लेखणीतून,
आकाशाच्या कोर्‍या पाटीवर
भरजरी किरणांतून...

उग्र थंडीत
गारठल्या बोटांतून,
भर उन्हात
कोवळ्या झुळूकांतून,

रखरखत्या भुईच्या
भेगा भेगांतून,
गच्च दाटल्या
काळ्या मेघांतून..

तू उमल,
तू बहर...

आकाशगंगेला कवेत घे,
नात्यांना उशाशी..

कधी रणरागिणी
कधी प्रेयसी,
कधी बंडखोर
कधी श्रेयसी..

ये,
हर रूपात साकार हो...
हे कविते,
अलिंगन दे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमिनीच्या भूर्जपत्रावर हे खटकतंय .......... Sad

जमिनीच्या " मृदपॄष्ठावर ".......... बरं वाटेल ?. पहा, विचार कर पण बदल कर कांहीतरी.........

बाकी छान आहे हे सांगायची आवश्यकताच नाही .....:)