वणवा

Submitted by जयदीप. on 8 December, 2013 - 10:36

कोणी गाणे म्हणतो आहे
कोणी येथे कण्हतो आहे

कोणा कळलो वा ना कळलो
मी दु:खाला कळतो आहे

जपतो जो तो त्याचे ते पण
मी माझेपण जपतो आहे

आयुष्याचा जळता विस्तव
बघता बघता विझतो आहे

जंगल जळले, वणवा गेला
वणवा आता रडतो आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users