पुस्तक

Submitted by रसप on 7 December, 2013 - 23:27

एक पुस्तक लिहावं, असा विचार करतो आहे

नाव 'तू'
हक्क तुझे
प्रस्तावना तुझी
मुखपृष्ठ तू
मलपृष्ठही तूच
आतला शब्दन् शब्द तुझाच
फक्त मनोगत माझं....

हे पुस्तक जगासाठी नसेल
फक्त आपल्यासाठी असेल
कारण खूप काही अव्यक्त राहिलंय
कारण खूप काही अव्यक्तच राहणार आहे

एक पुस्तक लिहिणार आहे
आठवांच्या पानांवर, आसवांच्या शाईने..

....रसप....
७ डिसेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/12/blog-post_8.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बढिया...

एक पुस्तक लिहिणार आहे
आठवांच्या पानांवर, आसवांच्या शाईने..>>>>>>> आणि तू ही ते वाचशील पावसाळी डोळ्यांनी.....कोरड्या पडलेल्या मनाला पाण्याच्या थेंबांनी भिजवत.....!!!