अन्तिम इच्छा

Submitted by shilpa mahajan on 7 December, 2013 - 06:41

कष्ट जिवाचे सर्व निमाले
आता पिसासम हलकी झाले
वाऱ्याच्या झुळूकीसम आता
संचारा मोकळी जहाले .

उभी तुझ्या दारी देवा मी
द्वार तुझे परी बंद दिसे
पाप पुण्याच्या हिशोबाविना
उघडणार ते असे कसे ?

आत्म्यांची जमली ही गर्दी
कळे न केव्हा येईल वर्दी
' मोक्ष' मिळे की ' नवा जन्म' ते
जाणण्यास ही भाऊगर्दी

' मोक्ष' कशी मी मागणार तुज
पुण्य न केले काही मी
नव्या जन्मी दे दुःख ही नवे
आशा अशी करू का मी ?

नवा जन्म पुरुषाचा यावा
स्त्री दुःखांचा विसर पडावा
स्त्री देहाचा भार वाहता
या जन्मी थकले रे मी !

पुण्याई नसल्याने तितुकी
स्त्री जन्मच पडला पदरी
अहेव पणाने मरण मिळावे
इतके भाग्य तरी मज द्यावे

हे ही नसले नशीबी जरी
वांझ राहू दे जन्मभरी
पुत्रवती होऊनी कमनशिबी
ठरले रे या जन्मांतरी

दुहिता देई मजला देवा
जाय सासरी सोडून जी
गळा दाटुनी पाय अडखळे
दुःखी वियोगे होईल जी

देह त्यागुनी येईन जेव्हा
देवा पुन्हा तुझ्या दारी
दुःखाश्रू दाटावे नेत्री
अंतिम इच्छा उरे उरी !!!
------------०-------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शशांक जी . ती ओळ मलाही खटकत होती. खरं तर ही कविता मला हिंदीत सुचली आणि मी ती हिंदीतच लिहिली आहे . इथे हिंदी चालत नाही म्हणून तिचे मराठी भाषांतर केले खरे पण तिला ओरिजिनल कवितेचा फील काही आला नाही . असो . तुम्ही निदान वाचलीत तरी . म्हणून स्वतःला खटकलेली परंतु दुरुस्ती चा कंटाळा केलेली ओळ बदलली आहे . हि पण पूर्णपणे चपखल नाही याची जाणीव आहे .

नवा जन्म पुरुषाचा यावा...????

पुण्याई नसल्याने तितुकी
स्त्री जन्मच पडला पदरी....????

असं का वाटतंय तुम्हाला??