मज जराशी पाज आता..

Submitted by जयदीप. on 7 December, 2013 - 04:52

मज जराशी पाज आता
आरसा नाराज आता

तू नको ओढूस भात्या
संपला आवाज आता

वाटले ते बोललो मी
सोडली मी लाज आता

भरकटूनी रोज झाले
का दिशांना माज आता?

झाकले मी कान माझे
तू कितीही वाज आता!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाकले मी कान माझे
तू कितीही वाज आता!<< छान

लाजही ओक्के ! वाटते ते बोलतो असे करा व्याकरणानुसार काळ योग्यपणे सांभाळला जाईल
बाकीचे केवळ यमकप्रधान
रदीफही बहुतांश जागी चपखल वाटत नाही

शुभेच्छा

सुंदर..

यावरून माझ्या एका गझलेची आठवण झाली.

तोच रदीफ, तोच काफिया आणि चक्क वृत्त ही तेच... हा योगायोग आहे का?

हो प्रशांतजी. मी तुमची गझल वाचली नव्हती...
हा निव्वळ योगायोग आहे..

त्यातून माझ्याकडून तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफ करा.

भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफ करा.<<
तुमचे चुकले नाही काहीही आणि पोरे आनंद झाल्याच्या भावना प्रकट करत आहेत तो तुमच्याशी शेअर करत आहेत

मी ऐकले आहे आणि मलाही ते पटते की गझलेच्या जमीनीवर कधीही कोणा एकाची मालकी नसते