जाग

Submitted by रसप on 7 December, 2013 - 00:19

अंगावरची शाल बाजूला झाल्याने थंडी वाजतेय,
असं वाटून जाग आली
प्रत्यक्षात तू जराशी बाजूला झाली होतीस
तुझा सैल पडलेला हात माझ्या गळ्यात होता,
पण तो शालीसारखाच निपचित

तुझ्या केसांचा सुगंध श्वासांत बाकी होता
विझलेल्या उदबत्तीच्या गंधासारखा
तुझ्या स्पर्शाचा शहारा अजून जाणवत होता
मावळतीच्या तांबड्या रंगासारखा

त्या पहाटे सूर्य उगवला नाही
आजपर्यंत सूर्य उगवलाच नाही

....रसप....
७ डिसेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/12/blog-post_7.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहमत उल्हासजींशी. >>पण फारच गंभीर आशय असल्याने ....>> दचकवणाऱ्या शोकान्त प्रतिमा -निपचित हात,विझलेली उदबत्ती, मावळते रंग, न झालेली पहाट.