स्वप्न

Submitted by sherloc on 6 December, 2013 - 00:05

माबो वरून काही काळासाठी लांब असतानाच्या काळात सुचलेल्या काही ओळी
****************************************
चुकुन उघडली मनाची कवाडं सताड मी
पाहून पसारा पलीकडचा, उडालो तिन-ताड मी

जी नव्हती दिसली आजवर किलकिल्या फटीतून
हजारो स्वप्नं बसली होती दाटीवाटीने अंग चोरून

काही छोटी, काही मोठी
काही स्वप्नं दुर्बोध, काही अगदीच बाळबोध

कंडक्टर ते डॉक्टर, केवढी स्वप्नांची रेंज
कळलंच नाही काळाबरोबर, कधी झाली चेंज

कुतूहलाने टाकलं, त्या विश्वात पाऊल
बरीचशी स्वप्नं भित्री, पळाली लागताच चाहूल

काही जूनी मरणासन्न, काही नव्यांचा उगीचच धुडगुस
सगळ्यांचीच केली मी आस्थेने विचारपूस

पुर्तीची आश्वासनं-बिश्वासनं,
काही दुखावलेल्यांचे शाल-जोडीतले आहेर
कोण जाणे केव्हा पडलो, त्या दुनियेच्या बाहेर

एवढी स्वप्नं भेटली, तरी वाटलं काही तरी राहीलं
विचार केला तेव्हा लक्षात आलं की अरे !
"माणूस" होण्याचं, स्वप्नंच मी नव्हतं पाहीलं !

- शैलेंद्र साठे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users