विश्वास...

Submitted by shriya.keskar on 4 December, 2013 - 05:17

श्वासात तुज़्या ह्या श्वास मिसळुनी
ऐकु दे तव ह्रदयाचे ठोके
मंतरलेले क्षण हे सारे
मनात ह्य साठवू दे अवघे..................!
नज़ारेत तुज़या ह्या नज़र घालूनी
पाहु दे प्रेमनगरी अनोखी
अनमोल ही प्रितिची चित्रे
पापणीत ह्या लपवू दे अवघी................!
शब्दात तुज़या ह्या शब्द ओवूनी
बनवू दे भावगीत निराळे
बोलकया अपूल्या भावनाना
ह्रदयात असती स्थान आगळे..................!
हातात तुज़या ह्या हात देवूनी
जाणवू दे तव स्पर्श रेशमी
अगाध विश्वास नातयामधला
असाच राहो जन्मोजन्मी.................!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users